Headlines

Ind Vs Eng T20: मालिकेतील पहिल्या सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, ‘ कसोटी पराभवामुळे..’

[ad_1]

Ind Vs Eng T20 Series: भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असून कसोटी सामन्यानंतर आता टी 20 आणि वनडे मालिका खेळणार आहे. टी 20 मालिकेतील पहिला सामना आज रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली रात्री साडे दहा वाजता साउथम्पटनमध्ये खेळला जाणार आहे. कसोटी मालिका बरोबरीत सोडवल्याने इंग्लंड संघाचा आत्मविश्वास दुणावला आहे.  इंग्लंडकडून शेवटच्या कसोटी सामन्यात पराभव झाल्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

“शेवटच्या कसोटी सामन्यात विजय न मिळवणं निराशाजनक आहे. कसोटी मालिका भारताने जिंकणं गरजेचं होतं. या पराभवाचा वनडे आणि टी 20 मालिकेवर कसा प्रभाव पडतो, हे येणारा काळच सांगेल. तो एक वेगळा फॉर्मेट होता आणि हा वेगळा फॉर्मेट आहे.”, असं कर्णधार रोहित शर्मा याने सांगितलं.

“टी 20 विश्वचषकावर आमची नजर आहे. त्यामुळे ही मालिका जिंकण गरजेचं आहे. भारतासाठी प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे आणि आम्हाला मालिका जिंकायची आहे. इंग्लंडकडून आम्हाला चांगलंच आव्हान मिळेल.”, असंही रोहित शर्मा याने पुढे सांगितलं. 

दोन्ही संघाचे खेळाडू

टीम इंडिया: रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल , आवेश खान, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक.

टीम इंग्लंड : जॉस बटलर (कप्तान), मोइन अली, हैरी ब्रूक, सैम करन, रिचर्ड ग्लीसन, क्रिस जॉर्डन, लियम लिविंगस्टोन, डेविड मलान, टाइमल मिल्स, मैथ्यू पार्किंसन, जेसन रॉय, फिल साल्ट, रीस टॉपली और डेविड विली.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *