Headlines

IND vs ENG : सूर्यकुमार नाही तर ‘या’ घातक फलंदाजापासून इंग्लंडला धोका; केल्यात सर्वाधिक धावा

[ad_1]

IND vs ENG T20 World Cup, 2nd Semi Final : भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात टी-20 विश्वचषक 2022 चा (T20 World Cup 2022) उपांत्य सामन्याचा थरार आज पाहायला मिळणार आहे. दुपारी  1.30 वाजता अॅडलेडच्या मैदानावर (adelaide oval) हा सामना खेळवला जाणार आहे. आकडेवारी पाहता इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताला विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. दोन्ही संघ 35 वर्षानंतर सेमीफायनलमध्ये तर 9 वर्षांनंतर आयसीसी स्पर्धेच्या बाद फेरीत आमनेसामने येणार आहेत. 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात शेवटची लढत झाली होती. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारत चॅम्पियन झाला होता. आता दोन्ही संघ टी-20 विश्वचषकात भिडणार आहेत. हा सामना जिंकणारा संघ पाकिस्तानसोबत टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना खेळणार आहे.  भारत आणि पाकिस्तानच्या संघात (ind vs pak) अंतिम सामना व्हावा अशी इच्छा दोन्ही देशांच्या चाहत्यांमध्ये आहे. मात्र आजच्या सामन्यातून अंतिम सामना कोणामध्ये खेळवला जाणार हे नक्की होणार आहे.

त्यामुळे सामन्याचे महत्त्व खूप वाढले आहे. इंग्लंडविरुद्ध टी-20मध्ये भारतीय फलंदाजांनी नेहमीच उत्कृष्ट कामगिरी केली आहे. अशा स्थितीत उपांत्य फेरीतही अशीच चमकदार कामगिरी अपेक्षित आहे. भारतीय संघातील काही खेळाडूंकडे सर्वांचेच लक्ष्य लागलं आहे. भारतीय संघात असे काही खेळाडू आहेत, जे या सेमीफायनल सामन्यात इंग्लंड संघासाठी सर्वात मोठा धोका ठरु शकतात. हे खेळाडू इंग्लड उद्ध्वस्त करू शकतात.

हे ही वाचा : IND vs ENG : भारत – इंग्लंड सेमीफायनलमध्ये कोण मारणार बाजी? आकडेवारी पाहून निकाल स्पष्टंय

फलंदाजीमध्ये तिघांवर भिस्त

भारतीय फलंदाजीमध्ये कर्णधार रोहित शर्मा (rohit sharma), केएल राहुल (kl rahul) आणि सूर्यकुमार यादव (suryakumar yadav) हे इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सामन्यांमध्ये शतके झळकावणाऱ्या फलंदाजांमध्ये आहेत. या भारतीय फलंदाजांनी आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये एकूण 10 शतके झळकावली आहेत. यापैकी तीन फक्त इंग्लंडविरुद्ध आहेत. सूर्याने या वर्षी जुलैमध्ये इंग्लंड दौऱ्यावर पहिले टी-२० शतक झळकावले होते. या व्यतिरिक्त विराट कोहलीसुद्धा (virat kohli) इंग्लंडच्या संघाला भारी पडण्याची शक्यता आहे.

कोहलीची इंग्लंडविरुद्ध 4 अर्धशतके 

दुसरीकडे भारताच्या फलंदाजांनी इंग्लंडविरुद्धच्या टी- 20 सामन्यांमध्ये 14 अर्धशतके झळकावली आहेत. विराट कोहलीने इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक चार अर्धशतके झळकावली आहेत. रोहित शर्मानेही इंग्लंडविरुद्ध दोन अर्धशतके झळकावली आहेत. महेंद्रसिंग धोनी, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, सुरेश रैना, गौतम गंभीर, श्रेयस अय्यर आणि युवराज सिंग यांनी इंग्लंडविरुद्ध किमान एक अर्धशतक झळकावले आहे. त्यामुळे या सामन्यामध्ये विराटकडे सर्वांचेच लक्ष्य असणार आहे.

हे ही वाचा : Virat Kohli : विराट कोहली आज अ‍ॅडलेडमध्ये ‘हा’ विश्वविक्रम मोडणार? केवळ इतक्या धावांची गरज

सर्वाधिक धावासुद्धा कोहलीच्याच!

इंग्लंडविरुद्ध टी-20मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही भारतीय फलंदाजांचे वर्चस्व आहे. अॅरॉन फिंच (619 धावा) नंतर विराट कोहलीने टी-20 मध्ये इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावा केल्या आहेत. विराटने 19 सामन्यांत 4 अर्धशतकांच्या मदतीने 589 धावा केल्या आहेत. विराट कोहलीने इंग्लंडविरुद्ध 57 चौकार आणि 17 षटकार मारले आहेत. तर रोहित शर्माने 13 डावात 383 धावा केल्या आहेत. 

गोलंदाजीमध्ये अश्विनच्या कामगिरीकडे लक्ष्य

ऑफ-स्पिन गोलंदाजीचा रविचंद्रन अश्विन हा जगातील सर्वात धोकादायक फिरकीपटूंपैकी एक आहे, जो उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंड संघाच्या फलंदाजांचा धुव्वा उडवू शकतो. अॅडलेडच्या खेळपट्टीवर चेंडू स्पिन होण्याची अपेक्षा आहे, त्यामुळे रविचंद्रन अश्विन हा इंग्लंड संघासाठी सर्वात मोठा धोकादायक खेळाडू  ठरू शकतो. फिरकी गोलंदाजांसमोर खेळण्यात इंग्लंडचे खेळाडू कमकुवत आहेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *