Headlines

IND vs BAN: टीम इंडियाला मोठा झटका, व्हिसा न मिळाल्याने ‘हा’ खेळाडू अजूनही भारतातच!

[ad_1]

India vs Bangladesh 1st Test: भारत आणि बांगलादेश यांच्यातील (BAN vs IND) चितगावच्या जहूर अहमद चौधरी स्टेडियमवर उद्यापासून (14 डिसेंबर) मालिकेतील पहिला सामन्याला सुरूवात होणार आहे. वन डे मालिकेत भारतीय संघ 2-1 ने पराभूत झाला. कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी संघ खेळाडूंच्या दुखापतींच्या समस्यांशी झुंजत आहे. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पहिली कसोटी खेळू शकणार नाही. मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि रवींद्र जाडेजाही (Ravindra Jadeja) जखमी असल्याचे बोलले जातेय. असे असताना टीम इंडियातून (team India News) एक धक्कादायक बातमी समोर येतेय.  व्हिसा (Visa) न मिळाल्याने संघातील एक खेळाडू अद्याप बांगलादेशला पोहोचू शकलेला नाही. या खेळाडूला नुकतेच संघात स्थान देण्यात आले होते, मात्र आता हा खेळाडू पहिल्या कसोटीतून जवळपास बाहेर पडल्याचे मानले जात आहे.

टीम इंडियाला मोठा धक्का

14 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता उभय संघांमधील सामना सुरु होईल. 31 वर्षीय वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट (Jaydev Unadkat) या सामन्यासाठी तयार नाही. क्रिकबझच्या वृत्तानुसार, उनाडकट अद्याप बांगलादेशला पोहोचलेला नाही. 12 वर्षांनंतर भारतीय कसोटी संघात पुनरागमन करणारा सौराष्ट्राचा हा वेगवान गोलंदाज अजूनही भारतातच अडकला आहे. त्याच्या व्हिसाची कागदपत्रे मिळालेली नाहीत आणि बोर्ड त्याला बांगलादेशला नेण्यासाठी प्रयत्न करत आहे. मंगळवारपर्यंत उनाडकट अजूनही राजकोटमध्ये घरी असल्याचे समजते. अशा स्थितीत तो पहिल्याच सामन्यातून बाहेर पडला आहे. 

वाचा : धक्कादायक! ‘या’ खेळाडूला मैदानातून थेट हॉस्पिटलमध्ये करावं लागलं दाखल, कोण आहे तो क्रिकेटर?

यामुळे व्हिसाला विलंब होत आहे

BCCI त्या सर्व खेळाडूंसाठी व्हिसाची व्यवस्था करते, ज्यांना निवडीसाठी समाविष्ट केले जाऊ शकते. मात्र जयदेव उनाडकटच्या बाबतीत, मोहम्मद शमीच्या (Mohammed Shami) दुखापतीनंतर त्याची निवड झाल्यामुळे प्री-बुकिंग करण्यात आले नव्हते. खांद्याच्या दुखापतीमुळे शमी या मालिकेचा भाग होऊ शकला नाही.

देशांतर्गत क्रिकेटच्या बळावर स्थान मिळाले

31 वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटने (Jaydev Unadkat) त्याची एकमेव कसोटी 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियन येथे खेळली होती. त्याने सात वनडे आणि 10 टी-20 आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये 10 सामन्यांत 19 बळी घेऊन तो सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता. या शानदार कामगिरीनंतरच त्याचा टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे. यासोबतच जयदेवने 96 सामन्यांच्या कारकिर्दीत 353 विकेट्स घेतल्या आहेत. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *