Headlines

IND vs BAN : भारत-बांगलादेश सीरिजआधी वाईट बातमी, दुखापतीमुळे स्टार खेळाडू ‘आऊट’

[ad_1]

ढाका : टीम इंडिया न्यूझीलंड (IND vs NZ) दौऱ्यानंतर आता बांगलादेश दौऱ्यावर (India Tour Of Bangladesh 2022) जात आहे. या दौऱ्याची सुरुवात 4 डिसेंबरपासून होत आहे. या दौऱ्याची सुरुवात ही एकदिवसीय मालिकेने होणार आहे. मात्र त्याआधी क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी समोर आली आहे. पहिल्या सामन्याआधी मॅचविनर खेळाडू बाहेर पडला आहे. दुखापतीमुळे या खेळाडूला पहिल्या सामन्याला मुकावं लागणार आहे. या गोलंदाजांने टी 20 वर्ल्ड कपमध्ये शानदार कामगिरी केली होती. (ban vs ind odi series bangladesh bowler taskin ahmed 1st odi due to injurey against team india)

बांगलादेशचा वेगवान गोलंदाज तस्कीन अहमद (Taskin Ahmed) पहिल्या सामन्यातून बाहेर झालाय. पाठदुखीच्या त्रासामुळे तस्कीनला माघार घ्यावी लागलीय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वेगवान गोलंदाज शरीफुल इस्लामला संघात  बदली खेळाडू म्हणून घेतल्याचं वृत्त आहे. तस्कीनने गेल्या वर्षात 19 एकदिवसीय सामन्यात 22 विकेट्स घेतल्या होत्या. 

तमीम इकबाललाही दुखापत

दरम्यान तस्कीनशिवाय कर्णधार तमीम इकबालला 30 नोव्हेंबरला शेर-ए-बांगला स्टेडियममध्ये सरावादरम्यान दुखापत झाली. त्यामुळे टीम मॅनेजमेंटची चिंता वाढलीय. तमीमच्या मेडिकल रिपोर्टची आम्ही वाट पाहत आहोत. तमीमला कमरेत दुखापत झाली. त्यानंतर तमीमला आवश्यक उपचार घेण्यास सांगितलं होतं. 

बांगलादेश विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर आणि यश दयाल. 

बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया 

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर , मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *