Headlines

IND vs AUS test: स्डेडियममध्ये लागले Rishabh Pant च्या नावाचे नारे; विराटही झाला भावूक

[ad_1]

Rishabh Pant : बॉर्डर-गावस्कर (Border–Gavaskar Trophy) सिरीजमधील दुसरी टेस्ट मॅच भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात दिल्लीत खेळवली जातेय. दिल्ली टेस्ट सध्या दोन कारणांमुळे चर्चेत आहे. पहिलं म्हणजे, चेतेश्वर पुजाराच्या कारकिर्दीतील ही 100 वी टेस्ट आहे तर दुसरं म्हणजे विराट कोहली (Virat Kohli) बऱ्याच काळानंतर घरच्या मैदानावर टेस्ट खेळतोय आहे. 

असं असूनही, विराट कोहली (Virat Kohli) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) फलंदाजी करत असताना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर एका खेळाडूच्या नावाचा आवाज घुमत होता. या खेळाडूची उणीव बॉर्डर-गावसकर सिरीजदरम्यान सर्वाधिक जाणवत होती.

कोहलीसमोर लागले पंतच्या नावाचे नारे

विराट कोहली आणि जडेजा फलंदाजी करत असताना अचानक अरुण जेटली स्टेडियममध्ये पंतचे नावाचा जयघोष सुरु झाला. या टेस्ट सिरीजमध्ये केवळ टीम इंडियाच नाही तर क्रिकेट चाहतेही ऋषभ पंतला खूप मिस करताना दिसून येतंय. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

ऋषभ पंत गेल्या अनेक वर्षांपासून टेस्ट टीमचा नियमित प्लेअर आहे. त्याने भारतासाठी अनेक मॅच-विनिंग इनिंग्स खेळल्या आहेत. अशा स्थितीत ऋषभच्या नावाने घोषणाबाजी होत असताना विराट कोहलीलाही त्याची आठवण झाली आणि तो काही  सेकंद मैदानाकडे पाहत राहिला. 

दिल्ली आणि पंतचं खास नातं

ऋषभ पंत उत्तराखंडचा आहे, मात्र त्याच्या क्रिकेट कारकीर्दची सुरुवात ही दिल्लीत झाली. त्यामुळे पंतला दिल्लीचा स्थानिक मुलगाही मानला जातो. दिल्लीचे क्रिकेट चाहते त्याला खूप सपोर्ट करतात. इतकंच नाही तर पंत आयपीएलमध्येही दिल्ली कॅपिटल्सकडूनही खेळतो आणि तो या टीमचा कर्णधार आहे. 

पंतचा झाला होता गंभीर अपघात

ऋषभ पंतचा 30 डिसेंबर रोजी सकाळी अपघात झाला होता. तो स्वत: गाडी चालवत घरी जात होता. यावेळी त्याचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दिल्ली-डेहराडून महामार्गावर त्याची कार डिव्हायडरला धडकली. यानंतर ऋषभच्या गाडीला आग लागली. काही लोकांनी त्याला तातडीने गाडीतून बाहेर काढत रुग्णालयात दाखल केलं. यावेळी ऋषभच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला दुखापत झाल्याची माहिती देण्यात आली होती.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *