Headlines

IND vs AUS: मैदानात सामना रंगला होता आणि तर स्टेडियममध्ये…; धक्कादायक प्रकाराने पोलिसंही हैराण

[ad_1]

IND vs AUS: नागपूरच्या जामठा स्टेडियमवर (Nagpur test Cricket) क्रिकेट टेस्ट सुरू असताना ऑनलाईन बेटिंग (online betting) करताना चार जणांना पोलिसांनी अटक केली. नागपूरच्या गुन्हे प्रकटीकरण युनिट 1 च्या पथकांन ही कारवाई केली. यात भारत ऑस्ट्रेलिया सामना पाहत चौघेही स्टेडियमच्या साऊथ झोन मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बसले होते. यात मोबाईल वरून ऑनलाईन वेबसाईटवर क्रिकेट सट्टा लावत होते. 

स्टेडियमवर लाईव्ह सुरू असलेला क्रिकेटचा सामना आणि लाइव ब्रॉडकॉस्टिंग यामध्ये असणारा 15 ते 17 सेकंदाचा डीलेचा फायदा घेऊन हे क्रिकेट सट्टा खेळत असल्याच पोलिसांना गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर यात चौघांना ताब्यात घेतलं असून यातील एक जण हा मुंबई, एक भंडारा तर दोघे जण हे नागपूरचे रहवासी असल्याचं समोर आले आहे. या रॅकेटचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान याविषयी क्राईमब्रांचचे पोलीस निरीक्षक किशोर परवते यांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेल्या या व्यक्तींकडून 4 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. या चारही मोबाईल्सचा डिलेट तपासणी केली जाईल. त्याचप्रमाणे, या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल.

नागपूरमध्ये खेळवली जातेय पहिली टेस्ट

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला सुरुवात झाली असून पहिला सामना नागपूरमध्ये खेळवला जातोय. या सामन्याचा आज दुसरा दिवस होता. दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस टीम इंडियाची स्थिती 321 रन्सवर 7 विकेट्स अशी आहे. 

रोहितचा नवा रेकॉर्ड

कर्णधार रोहित शर्माने शतकासह जबरदस्त कारनामा केला आहे. कॅप्टन म्हणून शतक करण्याऱ्यांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचे दिग्गज खेळाडू सर डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर दुसरं स्थान पटकावलं आहे. तर भारताचा कर्णधार म्हणून कसोटी, एकदिवसीय, T20 मध्ये शतक झळकावणारा रोहित शर्मा पहिला भारतीय ठरला.

कांगारूंविरूद्ध एकटा लढला Rohit Sharma

गेल्या काही दिवसांपासून रोहित शर्मा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आऊट ऑफ फॉर्म होता. नुकतंच वनडेमध्ये शतक ठोकल्यानंतर आता टेस्ट क्रिकेटमध्ये देखील त्याने शतक करत टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. नागपूरच्या टेस्टमध्ये चाहत्यांना पुन्हा एकदा जुना रोहित शर्मा पहायला मिळाला. 

नागपूरचं पीच असं आहे जिथे, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि सूर्यकुमार यादव सारखे फलंदाज स्वस्ताक माघारी परतले. मात्र टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा एकटाच खेळला आणि खणखणीत शतक मारलं. रोहितने 120 रन्सची उत्तम खेळी केली आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *