Headlines

IND vs AUS : मोठी बातमी! बॉर्डर गावस्कर ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलियाने अचानक भारताशी खेळण्यास दिला नकार

[ad_1]

IND vs AUS: न्यूझीलंडविरूद्धची टी-20 सिरीज संपल्यानंतर टीम इंडिया आता पूर्णपणे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) च्या तयारीमध्ये लागली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामध्ये 4 सामन्यांची टेस्ट सिरीज होणार आहे. या सिरीजची सुरुवात 9 फेब्रुवारी रोजी होणार असून पहिला सामना नागपूरमध्ये (Nagpur Test) खेळवला जाणार आहे. ऑस्ट्रेलियाची टीम भारतात आली असून त्यांना प्रॅक्टिस सामने खेळायचे आहेत, मात्र त्यापूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे.

IND vs AUS: ऑस्ट्रेलिया ने भारतासोबत खेळण्यास दिला नकार 

नागपूरमध्ये सिरीजचा पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या टीमला निर्धारित सिरीजपूर्वी अभ्यास सामना खेळायचे आहेत. मात्र हे सामने खेळवण्यास ऑस्ट्रेलियाने नकार दिल्याची माहिती आहे. ऑस्ट्रेलिया टीमला 6 तारखेला प्रॅक्टिस सामना खेळायचा आहे. 

गेल्या वेळी जेव्हा बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळवण्यात आली होती, तेव्हा भारताने ऑस्ट्रेलियावर 2-1 असा ऐतिहासिक विजय मिळवला होता. ही सिरीज खूप गाजली होती, कारण या सिरीजमध्ये टीम इंडियाचे अनेक खेळाडू दुखापतग्रस्त झाले असूनही सिरीज कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने जिंकली होती. यावेळी अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली होती. 

ऑस्ट्रेलियाला बीसीसीआयवर विश्वास नाही 

ऑस्ट्रेलियाच्या टीमने टेस्ट सिरीज सुरु होण्यापूर्वी अभ्यास सामने खेळणार नसल्याचं म्हटलं आहे. टीमचा स्टार फलंदाज स्टीव स्मिथ (Steve Smith) आणि कोच एंड्रूयू मॅकडोनाल्डचं असं मानणं आहे की, अभ्यास सामने खेळण्याने कोणताही फायदा होत नाही. भारतीय खेळपट्ट्यांवर सराव सामना खेळण्यापेक्षा नेटमध्ये सराव केलेला बरा. सराव सामन्यामध्ये पाटा खेळपट्ट्या आणि मालिकेमधील मुख्य सामन्यांमध्ये फिरकीला पुरक खेळपट्ट्या तयार केल्या जातात.

स्टीव्ह स्मिथने सांगितलं की, आम्ही नेटमध्ये सराव करून आमच्या स्पीनर्सला जास्तीत जास्त बॉलिंग करायला लावून अभ्यास करू, आम्ही मैदानात उतरण्याची वाट पाहत आहोत. सराव सामन न खेळण्याचा निर्णय योग्य आहे. कारण मागील वेळी सराव सामन्यामध्ये गवत असलेली खेळपट्टी बनवली होती आणि प्रत्यक्षात सामन्यावेळी आम्हाला फिरकीपटूंना सामोरं जाताना खूप कठीण गेलं होतं.

बीसीसीआयचा मोठा निर्णय

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या 4 सामन्यांच्या टेस्ट सिरीज नियमित कर्णधार रोहित शर्मा टीम इंडियाचे नेतृत्व करेल. तसेच भारतीय चाहत्यांना आता दोन्ही संघांमध्ये खेळली जाणारी ही मालिका मोफत पाहता येणार आहे. त्याची अधिकृत घोषणा करण्यात देखील यावेळी करण्यात आली  असून भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका स्टार स्पोर्ट्स तसेच डीडी स्पोर्ट्स फ्री टू एअर वाहिनीवर दाखवली जाणार आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *