Headlines

IND vs AUS: 42 दिवसात 7 थराराक सामने, कोणातचं पारडं जड? जाणून घ्या शेड्यूल आणि कुठे दिसेल LIVE सामना?

[ad_1]

IND vs AUS Test Series: सर्वात महत्त्वाची मानली जाणाऱ्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिकेला येत्या 9 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे.  नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर मालिकेचा पहिला सामना खेळला जाईल. त्यासाठी आता दोन्ही संघ मजबूत तयारी करताना दिसत आहेत. बंगलुरूमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ तयारी करताना दिसतोय. अशातच आता ही मालिका जिंकून पहिल्या स्थानावर विराजमान होण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये खेळल्या जाणाऱ्या मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक, रेकॉर्ड, कुठे पहायला मिळेल? याची संपूर्ण माहिती…

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये किती सामने खेळले जातील? 

ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यात 4 टेस्ट सामने खेळणार आहे. तर तीन वनडे सामने देखील खेळवले जाणार आहे.

कधी सुरूवात होणार?

कसोटी मालिकेला येत्या 9 फेब्रुवारीपासून सुरूवात होईल,  त्याचा पहिला सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोशिएशनच्या स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

बॉर्डर गावस्कर टॉफीचं शेड्यूल कसं असेल?

सर्व सामने सकाळी 9.30 पासून खेळवले जातील. पहिला सामना 9 ते 13  फेब्रुवारी, दुसरा सामना 17 ते 21 फेब्रुवारी, तिसरा सामना 1 ते 5 फेब्रुवारी, तर चौथा सामना 9 ते 13 फेब्रुवारीला खेळवला जाणार आहे. नागपूर, दिल्ली, धर्मशाला आणि अहमदाबाद असे अनुक्रमे सामने खेळवले जाणार आहे.

भारतीय संघात कोणाला संधी?

रोहित शर्मा (C) शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, केएल राहुल, एस भरत, इशान किशन, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यज्ञ, उमेश यार. जयदेव उनाडकट

ऑस्ट्रेलियाकडून कोण देणार टक्कर?

उस्मान ख्वाजा, मॅट रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशेन, अॅश्टन अगर, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी, पीटर हँड्सकॉम्ब, पॅट कमिन्स (C), स्कॉट बोलँड, जोश हेझलवूड, नॅथन लायन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी मिचेल स्टार्क, मिचेल स्वीपसन

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट सिरीजचा रेकॉर्ड काय आहे?

दोन्ही संघात 27 टेस्ट सिरीज खेळवली जात आहे. त्यात 12 सामने ऑस्ट्रेलियाने तर 10 सामने भारताने जिंकले आहेत. त्याचबरोबर 5 सामने बरोबरीने सुटले आहेत. भारतात 14 सामने खेळले जात आहेत, त्यात भारताचं पारडं जड ठरलंय. भारताने 8 तर ऑस्ट्रेलियाने 4 सामने जिंकले आहेत. त्यात 2 सामने बरोबरेने सुटले आहेत.

कुठे पहायला मिळतील?

टेस्ट सिरीजचं प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्क (Star Sports Network) वर पहायला मिळेल. स्टार स्पोर्ट्सच्या चॅनेलवर देश आणि विदेशात देखील सामना पहायला मिळेल. तर भारतात हॉटस्टारवर (Hotstar) पहायला मिळेल. त्याचबरोबर झी 24 तासच्या लाईव्ह ब्लॉगवर देखील तुम्हाला सर्व माहिती दिली जाईल.

आणखी वाचा – IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचे 5 खेळाडू टीम इंडियाची धोक्याची घंटा, रोहित-विराट आत्ताच सावध व्हा!

वनडे सामन्याचं टाईमटेबल?

वनडेचा पहिला सामना मुंबईत 17 मार्च रोजी खेळला जाईल, तर दुसरा सामना 19 तारखेला विशाखापट्ट्नममध्ये खेळवला जाईल. तर चेन्नईच्या मैदानावर 22 मार्चला तिसरा आणि अखेरचा सामना असेल.

दरम्यान, सध्या ऑस्ट्रेलियन संघ (Australia) आयसीसी कसोटी क्रमवारीत (ICC Test Ranking) पहिल्या स्थानावर आहे तर भारतीय संघ (Team India) दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे आगामी सिरीज जिंकून पहिलं स्थान मिळवण्याचं लक्ष टीम इंडियाचं असणार आहे.

नागपूरमध्ये होणाऱ्या पहिल्या टेस्ट सामन्यातून भारताचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड (Josh Hazlewood) बाहेर झाला आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमला दुसरा एक मोठा धक्का बसला आहे. दुखापतीमुळे मिचेल स्टार्क (Mitchell Starc) देखील पहिल्या टेस्ट सामन्यामधून बाहेर पडला आहे. त्यामुळे आता मालिका जिंकण्यासाठी टीम इंडियाचं काम सोप्पं झालंय.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *