Headlines

ऑक्टोबरमध्ये तूळ राशीत सूर्यग्रहण आणि ग्रहांचा विचित्र योग, या 6 राशींना होणार यातना!

[ad_1]

Surya Grahan In Tula Rashi: ज्योतिषशास्त्र आणि ग्रह यांचं एक नातं आहे. या ग्रहमंडळातील गोचर बऱ्याच घडामोडी घडवत असतो. ऑक्टोबर महिन्यात ग्रहांच्या गोचरासोबत तूळ राशीत सूर्यग्रहण असणार आहे. या वर्षातील दूसरं सूर्यग्रहण 25 ऑक्टोबर रोजी असणार आहे. भारतातून दिसणारं हे पहिलं सूर्यग्रहण असून दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी लागणार आहे. त्यामुळे या काळात सूतक कालावधी महत्त्वाचा असणार आहे. गोचर कुंडलीनुसार सूर्यदेव तूळ राशीत असणार आहे. त्यामुळे गोचर कुंडलीनुसार तूळ राशीत ग्रहण असणार आहे. विशेष योगायोग म्हणजे या वेळी पाच ग्रह तूळ राशीत असणार आहेत. चंद्र, केतु, सूर्य, बुध आणि शुक्र अशा पाच ग्रहांची युती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे काही राशींवर अशुभ प्रभाव पडणार आहे. चला तर जाणून घेऊयात या 6 राशी कोणत्या आहेत.

वृषभ: सूर्यग्रहणाचा प्रभाव या राशीच्या लोकांच्या जीवनावर अधिक असेल. या काळात या राशीच्या लोकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. एखाद्या गोष्टीची अडचण असेल तर वेळेआधी सोडवण्याचा प्रयत्न करा.

मिथुन: मिथुन राशीच्या लोकांना कोणत्याही कामासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील, तरच यश मिळेल. उत्पन्नापेक्षा खर्च वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पैशांची विशेष काळजी घ्या.

कन्या: या काळात कन्या राशीच्या लोकांचा अनावश्यक खर्च वाढेल. यासोबतच कुठेतरी गुंतवणूक करायची असेल तर विचार करून सल्ला घ्या. अन्यथा, घाईघाईने घेतलेला निर्णय तुमच्यासाठी घातक ठरू शकतो.

वृश्चिक: या राशीच्या लोकांच्या आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम होईल. तुम्हाला पैशाच्या चणचण भासू शकते. त्यामुळे गरज नसल्यास तेथे जास्त पैसे खर्च करू नका. तसेच, गुंतवणूक करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे.

तूळ: सूर्यग्रहण तूळ राशीत होणार असून पाच ग्रह याच राशीत असणार आहेत. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना खूप त्रास सहन करावा लागू शकतो. कमकुवत आर्थिक स्थितीमुळे आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. तसेच वाहन चालवताना काळजी घ्या.

मकर: या राशीसाठी सूर्यग्रहण थोडे त्रासदायक ठरू शकते. या राशीच्या लोकांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. कोणत्याही कामात घाई करणे टाळा, अन्यथा सुरू असलेले काम बिघडू शकते. 

(Disclaimer: वरील माहिती सर्वसामान्य मान्यतांवर आधारित आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *