Headlines

Shah Rukh Khan ला बॉलिवूडमध्ये 31 वर्षे पूर्ण होताच ‘तो’ विचारतो, ‘सिगरेट पिने चलोगे क्या?’

[ad_1]

Shah Rukh Khan : बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरुख खानचे लाखो चाहते आहेत. त्याच्या करिअरला सुरुवात झाल्यापासून हे चाहते त्याच्यासोबत आहेत. शाहरुखला बॉलिवूडमध्ये 31 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानं 25 जून 1992 साली प्रदर्शित झालेल्या ‘दीवाना’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तर काल त्याला 31 वर्षे पूर्ण झाली त्यामुळे त्यानं सोशल मीडियावर Ask SRK हे सेशल घेत चाहत्यांशी संपर्क साधला. यावेळी एका चाहत्यानं शाहरुखला चक्क सिगरेट पिण्यासाठी विचारले असता त्यावर शाहरुखनं जे उत्तर दिलं ते ऐकूण सगळ्यांना आश्चर्य झाले. 

शाहरुखनं Ask SRK हे सेशल ट्विटरवर घेतले. यावेळी एका नेटकऱ्यानं शाहरुखला विचारलं की ‘दीवाना’ च्या सेटवरील अशी कोणती गोष्ट तुम्हाला आठवण आहे, जी तुम्ही कधीच विसरू शकत नाही? तेव्हा शाहरुख उत्तर देत म्हणाला, “दिव्या जी म्हणजेच (दिव्या भारती) आणि राज जी यांच्यासोबत काम करणं असेल.”

दुसऱ्या नेटकऱ्यानं शाहरुखला थेट सिगरेट प्यायला येशील का विचारले. ‘सोबत सिगारेट प्यायला येणार का?’ असा प्रश्न एका चाहत्याने विचारला. ‘त्यावर मी माझ्या वाईट सवयी एकटाच करतो’, असं थेट उत्तर शाहरुखने दिलं.

आणखी एका चाहत्यानं विचारलं की पैसा, प्रसिद्धी, आणि मुल्य या तिघांना ती कसं तू कसं प्राधान्य देशील? त्यावर उत्तर देत शाहरुख म्हणाला, आधी मुल्य आणि मग बाकी सगळं नंतर येत.” 

हेही वाचा : मनोरंजनाच्या नावाखाली सॉफ्ट पॉर्न…”, कुटुंबासोबत Lust Stories 2 पाहण्याचा सल्ला देणाऱ्या विजय वर्मावर नेटकरी संतप्त

दरम्यान, एका चाहत्यानं ‘दीवाना’ या चित्रपटातील ‘कोई न कोई चाहिए’ गा गाण्याचा एक व्हिडीओ शेअर केला आणि किंग खानला विचारलं की, “सर या कमाल एन्ट्रीबद्दल तुम्हाला आता काय वाटतं?”. यावर उत्तर देत शाहरुख जागरुकता करत म्हणाला की,” मी हेलमेट घालायला हवं होतं”. शाहरुख नेहमीच सगळ्यांना त्याच्या मजेशीर उत्तरातून जागरुक करण्याचा प्रयत्न करतो. 

यानंतर शाहरुखच्या एका चाहतीनं त्याला सांगितलं की “सर, मी जुळ्या मुलांची आई होणार आहे. कृपया मला तुमच्या शुभेच्छा द्या आणि माझ्या मुलांची नाव मी ‘पठाण’ आणि ‘जवान’ अशी ठेवणार आहे.” हे पाहता शाहरुख तिला उत्तर देत म्हणाला, “खूप खूप शुभेच्छा… पण मुलांची नाव काहीतरी छान ठेवू शकता.”

दरम्यान, शाहरुख लवकरच ‘जवाण’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत नयनतारा दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन हे एटली कुमारनं केलं आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *