Headlines

I tried to convince Uddhav Thackeray to go with BJP say maharashtra cm Eknath Shinde ssa 97

[ad_1]

महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्याने महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं होतं. त्यानंतर बरेच प्रयत्न केल्यानंतर शिंदे गट फुटला आणि राज्यात भाजपला सत्ता मिळू शकली. मात्र, महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यावर उद्धव ठाकरेंना भाजपाबरोबर युती करण्यासाठी मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांनी आमचं ऐकलं नाही, असा खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

‘इंडिया टुडे’च्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “भाजपा शिवसेनेचा नैसर्गिक मित्र होता. मात्र, २०१९ साली राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. त्यानंतर आम्ही उद्धव ठाकरेंना भाजपाबरोबर युती करण्यासाठी मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण, उद्धव ठाकरेंनी आमचे ऐकलं नाही.”

हेही वाचा : “९५ साली अजित पवार कुठे होते? तेव्हा…”, ‘त्या’ विधानावरून शहाजीबापू पाटलांचा खोचक सवाल; जयंत पाटलांनाही टोला!

“भाजपा आणि शिवसेना युतीने एकत्र…”

“राज्यात शिंदे-भाजपा सरकार कसे स्थापन झाले, हे महाराष्ट्रातील प्रत्येकाला माहिती आहे. आम्ही मुख्यमंत्रीपदासाठी भाजपाबरोबर सत्ता स्थापन केली नाही. २०१९ च्या विधानसभेत भाजपा आणि शिवसेना युतीने एकत्र निवडणूक लढली. त्यानंतर आलेल्या निकालात जनादेश भाजपा-शिवसेना युती सरकारसाच्या बाजूने होता. पण, उद्धव ठाकरेंनी मनाविरुद्ध २०१९ साली महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. याला शिवसेनेच्या आमदारांचा विरोध होता,” असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

हेही वाचा : “तुमच्या सुनबाई अमृता फडणवीसांना आधी सांगा,” संभाजी भिडेंविरोधात पुण्यात काँग्रेसचं जोरदार आंदोलन, म्हणाले “तुम्ही कोणतं धोतर…”

“सत्तेत असूनही सेनेच्या आमदारांना…”

“निवडून येणाऱ्या आमदारांना त्यांच्या मतदारसंघाचा कायपालट व्हावा वाटतो. गेली अडीच वर्षे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. सत्तेत असूनही सेनेच्या आमदारांना आणि कार्यकर्त्यांना न्याय मिळत नव्हता. त्यामुळे आमच्यापैकी अनेकांनी उद्धव ठाकरेंना भाजपाबरोबर युती करावी, यासाठी समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आम्ही त्यात यशस्वी झालो नाही,” अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *