Headlines

‘I Quit’.. वैशाली ठक्करची सुसाईड नोट समोर..नोटमधून धक्कादायक कारण समोर

[ad_1]

vaishali thakkar suicide note : छोट्या पडद्यावरील जवळपास सर्व मालिकांमध्ये काम केलेली अभिनेत्री वैशाली ठक्करनं इंदौर येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली  (vaishali takkar suicide case). गेल्या एक वर्षापासून ती याच शहरात राहत होती.

तिच्या निधनानं छोट्या पडद्यावरील कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. वैशालीनं आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईट नोट (vaishali takkar suicide note) लिहिली होती. पोलिसांनी अभिनेत्रीच्या मृत्यूचे कारण प्रेमप्रकरण असल्याचे सांगितले आहे. सध्या तिचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी (deadbody postmartem) पाठवून पुढील तपास करण्यात येत आहेत. 

पोलिसांना सापडली सुसाईड नोट (actress Vaishali Takkar leave suicide note)
टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्कर गेल्या 1 वर्षांपासून इंदूरमध्ये राहत होती. अभिनेत्रीच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून अभिनेत्रीचा मृतदेह ताब्यात घेतला. वैशालीच्या मृतदेहाजवळ पोलिसांना सुसाईड नोटही सापडली आहे. (vaishali takkar serials)
वैशाली टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री होती. वैशालीने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं, वैशालीने 2015 मध्ये टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय मलिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मधून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. 

नेहमी हसणारी आणि बडबड करणारी अभिनेत्री आता आपल्यात नाही यावर विश्वास बसत नाही. मात्र, काही लोकांमुळे त्याने हे पाऊल उचलले असून त्याचा उल्लेख सुसाईड नोटमध्येही केला आहे. अभिनेत्रीच्या सुसाईड नोटमध्ये धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. . यासोबतच पालकांसाठी एक खास मेसेजसुद्धा तिने या नोटमध्ये  लिहिलाय.  सुसाईड नोट  पोलिसांनी जप्त केली, यासोबतच तिची डायरीही ताब्यात घेण्यात आली आहे. अभिनेत्रीने सुसाईड नोटमध्ये काय लिहिले आहे हे जाणून घेण्यासाठी तिच्या चाहत्यांना उत्सुकता होती. तर आता तिची सुसाईड नोट समोर आली आहे.,यामध्ये तिने राहुल नवलानी आणि त्याची पत्नी दिशा नवलानी  (rahul navlani disha navlani vaishali takkar case) यांच्यावर मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे.

वैशालीने सुसाईड नोटमध्ये लिहिलंय. 

 ‘I Quit’  आई .. ‘पपा आय लव्ह यु  मला माफ करा मी एक चांगली मुलगी होऊ शकले नाही पण प्लिज राहुल आणि त्याच्या फॅमिली ला शिक्षा झाली पाहिजे, मला गेली अडीच वर्ष  mentally tourcher केलं, राहुल आणि त्याच्या बायकोने. नाहीतर माझ्या आत्म्याला शांती नाही मिळणार तुम्हाला माझी शपथ. तुम्ही खुश राहा मी तुमच्यावर खूप प्रेम करते मितेशला सॉरी.. I Quit। वैशाली टक्कर.”

शिवाय तिच्या डायरीमधूनही बरेच खुलासे झाले आहेत .डायरीमध्ये तिने लिहिलंय ,’आई बाबा  आता बस्स  माझ्यासाठी तुम्ही खूप त्रास सहन केलात आणि मी स्वतःसुद्धा.. केवळ मला माहित आहे गेली 2 वर्ष मी काय सहन केलं आहे , राहुल नवलानीने माझ्यासोबत किती वाईट प्रकार केला आहे जे मी सांगू हि शकत नाही  माझं  शारीरिक आणि मानसिक रित्या शोषण केलं आहे आणि शेवटी मला धमकी दिली कि माझं लग्न होऊ देणार नाही आणि तेच त्याने केलं” 

त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण लागणार आहे हे नक्की.. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *