Headlines

‘त्यानं जबरदस्ती माझ्या छातीवर…,’ मराठमोळ्या अभिनेत्रीनं केला कास्टिंग काऊचचा खुलासा

[ad_1]

Actress talked bout the casting couch : आजकाल आपण पाहतो की अनेक कलाकार हे कास्टिंग काऊचचा शिकार होतात. त्यातील काही कलाकार हे पुढे येऊन त्यांना आलेल्या कास्टिंग काऊचच्या अनुभवा विषयी सांगतात. आता हा प्रकार छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री सोनल वेंगुर्लेकरसोबत घडला. आज सोनल ही लोकप्रिय अभिनेत्री असली तरी देखील करिअरच्या सुरुवातीला तिला कास्टिंग काऊचचा अनुभव आला होता. सोनलनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याविषयी खुलासा केला आहे. त्यानंतर सोनलला आलेला अनुभव पाहता सगळ्यांना धक्काच बसला. 

सोनलनं ही मुलाखत ‘बॉम्बे टाइम्स’ला 2018 मध्ये दिली होती. यावेळी तिला आलेल्या कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला. सोनलनं सांगितलं की तिला कमी वयाची असताना कास्टिंग काऊचचा अनुभव आला. त्यामुळे या गोष्टीचा तिच्यावर खोलवर परिणाम झाला होता. तिनं खुलासा केला की जेव्हा तिनं ऑडिशन द्यायला सुरुवात केली तेव्हा ती फक्त 19 वर्षांची होती. त्यावेळी तिला राजा बजाजच्या ऑफिसमध्ये एका भूमिकेसाठी ऑडिशन देण्याची संधी मिळाली. ते एक लोकप्रिय फोटोग्राफर आणि कास्टिंग डायरेक्टर होते. सोनलनं सांगितलं की तिनं ऑडिशन दिली होती, पण ती चांगल्या प्रकारे डायलॉग बोलू शकतली नाही, कारण तिनं तो पर्यंत कोणतीही ट्रेनिंग घेतली नव्हती. त्यानंतर कास्टिंग डायरेक्टरनं या प्रोफेशनला समजूण घेण्यासाठी मदत करतो असं सांगितलं.  

सुरुवातीला सोनल ही शूटिंगचा भाग नसतानाही तिला काही आउटफिट्स ट्राय करायला सांगितले आणि त्यानंतर तिच्या ब्रेस्टवर जबरदस्ती एक क्रीम लावली. त्यामुळे तिला खूप मोठा धक्का बसला होता. सोनल म्हणाली, “त्यांच्या हातात क्रीमची एक बॉटल होती. त्यांनी मला सांगितलं की ही कपडे घालण्यासाठी ती क्रीम ब्रेस्टवर लाव, त्यामुळे त्यांना तिचा योग्य शेप दिसेल. मी खूप घाबरले, ते पुढे आले आणि त्यानं जबरदस्ती माझ्या ब्रेस्टवर क्रीम लावली.”

पुढे सोनल म्हणाली की “हे पहिलं झालं आणि त्यानंतर रात्री ते जबरदस्ती माझ्या रुममध्ये आले आणि मला म्हणाले की मी तुला तंत्र विद्या शिकवेल, ज्यानं मी इंडस्ट्रीत सुपरस्टार होईल. सोनलनं सांगितलं की त्यांनी मला सांगितलं की मला सगळे कपडे काढावे लागतील आणि त्यांच्यासोबत सगळ्या मंत्रांचा जप करावा लागेल. त्यानंतर तिनं खुलासा केला की तिच्यासोबत जबरदस्ती देखील करण्यात आली होती, पण ती दुसऱ्या रुममध्ये जाण्यात यशस्वी ठरली. त्यानंतर तिनं राजा बजाज विरोधात तक्रार दाखल केली होती.” 

हेही वाचा : फक्त अभिनयातच नाही तर कमाईच्या बाबतीतही अल्लू अर्जुन ‘फायर’! ‘इतक्या’ कोटींच्या संपत्तीचा मालक

सोनलच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ‘वादा रहा’,’ये तेरी गलियां’,’साम दाम दंड भेद,’गुप्ता ब्रदर्स’,’शास्त्री सिस्टर्स’ आणि ‘कुंडली भाग्य’ सारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *