Headlines

‘मला सगळ्या स्त्रीयांची दया आली, तुमच्यासाठी नवा पुरुष…’; ‘ॲनिमल’ मधला रणबीरला पाहून संतापले स्वानंद किरकिरे

[ad_1]

Swanand Kirkire on Ranbir Kapoor’s role : लोकप्रिय दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाच्या ‘ॲनिमल’ या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगलाच जम बसवला आहे. सगळ्या प्रेक्षकांना या चित्रपटाची भूरळ लागली आहे. काही प्रेक्षकांना हा चित्रपट आवडला आहे तर काहींनी हा चित्रपट न पाहण्याचा सल्ला दिला आहे. यासगळ्यात अनेक लोक चित्रपटावर टीका करत आहेत. या सगळ्यात लोकप्रिय गायक स्वानंद किरकिरे यांचे देखील नाव आहे. त्यांना चित्रपटातील रणबीर कपूरची भूमिका आवडली नाही आणि त्यांनी या चित्रपटात कमी काढत या चित्रपटाला महिला विरोधी असल्याचं म्हटलं आहे. 

स्वानंद किरकिरे यांनी नुकताच ‘ॲनिमल’ हा चित्रपट पाहिला आणि ट्विटरवर त्याची प्रतिक्रिया दिली आहे. ते ‘ॲनिमल’ विषयी असं काही बोलून गेले की सगळ्यांच्या नजरा वळल्या आहेत. त्यानंतर नेटकऱ्यांमध्ये वाद सुरु झाला. काही नेटकऱ्यांनी स्वानंद किरकिरे यांना पाठिंबा दिला आहे, तर काहींनी विरोध. 

स्वानंद यांनी ट्वीट करत लिहिले की “सगळ्यासाठी चित्रपटाचे आभार, पण आज ‘ॲनिमल’ पाहिल्यानंतर मला आजच्या पिढीतील महिलांची खरोखर कीव आली. तुमच्यासाठी आता पुन्हा एकदा एका नव्या पुरुषाची निर्मिती करण्यात आली आहे. जो सगळ्यात भयानक आहे. जो महिलांचा इतका आदर करत नाही, जो तुम्हाला झुकवण्याचा, दबाव टाकण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातच त्याला पुरुषार्थ समजतो. आजच्या पीढीच्या मुली, तुम्ही चित्रपटगृहात बसून रश्मिकाला मारतानाच्या सीनवर टाळ्या वाजवत होत्या. तेव्हा मला मनातल्या मनात जाणवलं की समानता राहिली नाही. हताश आणि निराश मी घरी आलो. रणबीरचा एक संवाद आहे ज्यामध्ये तो अल्फा पुरुषाची व्याख्या सांगतो (की ‘जो मर्द अल्फा नहीं बन पाते वो सारे स्त्री का भोग पाने के लिए कवि बन जाते है और चांद-तारे तोड़कर लाने के वादे करने लगते है। मैं कवि हूं। कविता करता हूं जीने के लिए। मेरी कोई जगह है?’)”

हेही वाचा : किसिंग सीन्स, मारहाणीची दृष्ट असलेल्या रक्तरंजित ‘ॲनिमल’ची स्तुती दाक्षिणात्य अभिनेत्रीला भोवली

त्यांनी पुढे म्हटलं की एक चित्रपट सध्या खूप पैसे कमावतो आहे आणि भारतीय सिनेमाचा खूप सुंदर अशा इतिहासाला लाजवेल असा आहे. माझ्या मते हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीचं भवितव्य एका वेगळ्या आणि धोक्याच्या दिशेने घेऊन जाईल. मेहबूब खानचा ‘औरत’. शांताराम यांचा ‘औरत’, गुरु दत्त यांचा ‘साहब बीवी और गुलाम’, हृषिकेश मुखर्जी यांचा ‘अनुपमा’, श्याम बेनेगलचे ‘अंकुर’ आणि ‘भूमिका’, केतन मेहता यांचा ‘मिर्च मसाला’, सुधीर मिश्रा यांचे ‘गौरी’, ‘महिना’ ‘इंग्लिश विंग्लिश’, बहलचा ‘क्वीन’, सुजित सरकारचा ‘पिकू’ इत्यादी भारतीय चित्रपटसृष्टीतील असे अनेक चित्रपट आहेत. या चित्रपटांनी मला शिकवलं की स्त्रिचे अधिका तिचं स्वातंत्र्य आणि तिचा आदर कसा करायला पाहिजे. मात्र, इतक्या वर्षांनंतरी विचारांमध्ये किती कमतरता आहे. मी यशस्वी झालो की नाही माहीत नाही, पण आजही मी स्वत:ला सुधारण्याचा सतत प्रयत्न करतो.’ 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *