Headlines

‘मला लग्न लपवायचे नव्हते, पण…’, तापसी पन्नूचे स्पष्ट विधान, म्हणाली ‘एकही फोटो…’

[ad_1]

Taapsee Pannu Mathias Boe Wedding First Reaction : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू ही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. तापसीने तिचा बॉयफ्रेंड मॅथियस बो सोबत गुपचूप लग्नगाठ बांधली. तापसी आणि मॅथियसचा विवाहसोहळा 23 मार्च रोजी पार पडला होता. त्यांच्या लग्नाला कुटुंबातील नातेवाईक आणि जवळचे मित्र उपस्थित होते. तापसीच्या लग्नातील एकही फोटो किंवा व्हिडीओ तिने स्वत: शेअर केला नव्हता. त्यामुळे तिने लग्न केलं की नाही याबद्दल शंका उपस्थित केली जात होती. आता लग्नाला 20 दिवस उलटल्यानंतर तापसीने तिच्या लग्नावर शिक्कामोर्तब केले आहे. 

तापसी पन्नूने नुकतंच ‘हिंदुस्तान टाइम्स’ला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तापसी पन्नूला तिच्या लग्नाबद्दलचे अनेक प्रश्न विचारण्यात आले. यावेळी तापसीला तिच्या लग्नाच्या तयारीपासून एकही फोटो न शेअर करण्याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर तिने स्पष्ट भाषेत उत्तर दिले. “मी माझे वैयक्तिक आयुष्य सार्वजनिक करावं की नाही, याबद्दल मला माहिती नाही. कारण हल्ली लोक खूप लवकर जज करतात. मी माझ्या आयुष्यात याच पद्धतीने पुढे गेले आहे. मी माझं लग्न स्वतःपुरतं ठेवलं आहे”, असे तापसी म्हणाली. 

‘त्यामुळे मी निवांत होते’

“माझे लग्न लपवून ठेवण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. पण फक्त त्याचीच सतत चर्चा होईल, असा सार्वजनिक सोहळा करण्यासही मी इच्छुक नव्हते. त्यामुळे या सोहळ्याचे फोटो किंवा व्हिडीओ शेअर करण्याचा माझा कोणताही विचार नाही. मी अजून तरी त्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार नाही. पण मला माहिती आहे की माझ्या लग्नात जे लोक उपस्थित होते, ते माझ्यासाठी तिथे आले होते. मी जे काही करते त्यावर मत व्यक्त करण्यासाठी नाही. त्यामुळे मी निवांत होते”, असे तापसी पन्नूने म्हटले. 

“माझ्या लग्नातील सर्व जबाबदाऱ्या माझी बहीण शगुन पन्नूने पार पाडल्या. तिने माझ्या लग्नाचे सर्व नियोजन केले होते.  माझ्या लग्नातील सर्व कार्यक्रमाची जबाबदारीही तिचीच होती. माझ्या लगात मी फार कमी लोकांना आमंत्रण दिलं होतं, त्यामुळे तशी मला फार काळजी नव्हती”, असे तापसी पन्नूने सांगितले. 

आतापर्यंत लग्नातील दोन व्हिडीओ समोर

दरम्यान तापसी ही माजी बॅडमिंटनपटू मॅथियस बो सोबत दहा वर्षांपासून रिलेशनशिप आहे. तापसी आणि मॅथियसचा लग्नसोहळा 23 मार्च रोजी पार पडला. आतापर्यंत त्यांच्या लग्नातील दोन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यातील एका व्हिडीओत तापसीची एंट्री दिसत आहे. तर दुसरा व्हिडीओ हा संगीत कार्यक्रमादरम्यानचा आहे. आता तापसी ही ‘वो लडकी है कहा’ या चित्रपटात झळकणार आहे. यात तापसी पन्नू अभिनेता प्रतिक गांधीसोबत झळकणार आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *