Headlines

‘मला श्वासही घेता येत नव्हता, सलग 7 दिवस…’, तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर शिझान खानची झाली ‘अशी’ अवस्था

[ad_1]

Sheezan Khan Health Update : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तुनिषा शर्माने 24 डिसेंबर 2022 सेटवर गळफास घेत आत्महत्या केली. तुनिषा शर्माच्या आत्महत्या प्रकरणानंतर तिचा बॉयफ्रेंड अभिनेता शिझान खान चर्चेत आला. तुनिषाच्या आत्महत्येनंतर त्याला दोन महिने तुरुंगवासाची शिक्षा मिळाली. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली. काही दिवसांपूर्वी शिझान खान हा रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी समोर आली होती. आता खुद्द शिझान खानने त्याच्या तब्येतीची माहिती दिली आहे.

अभिनेता शिझान खान हा गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी शिझान खानला रुग्णालयात दाखल केल्याचे बोललं जात होतं. आता शिझान खानने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्याच्या तब्येतीची माहिती दिली आहे. यात त्याने त्याचे काही फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. यातील एका व्हिडीओत त्याला ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. तर एका फोटोत तो रुग्णांच्या कपड्यात आणि हातावर सलाईन लावलेल्या अवस्थेत दिसत आहे. 

शिझान खान 7 दिवस रुग्णालयात

या पोस्टला कॅप्शन देताना त्याने त्याच्या तब्येतीची माहिती दिली आहे. यात तो म्हणाला, “गेले 20 दिवस आजारी असल्यापासून आणि 7 दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर अखेर मी आता घरी परतलो आहे. माझ्या संपूर्ण आयुष्यात मी इतका आजारी कधीच पडलो नव्हतो. या दरम्यान मला नीट पाणी पिता येत नव्हते. काहीही खायला जमत नव्हते. मला श्वासही घेता येत नव्हता.” 

“मी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येलाही रुग्णालयातच होतो. मी येत्या नवीन वर्षाचे सेलिब्रेशन कुटुंबासोबत करेन, असे ठरवले होते. पण तसे काहीच झाले नाही. मला असं वाटतं की, माझ्यावर गोळ्या-औषधांचा प्रभाव थोडा उशीरा सुरु झाला असावा. पण या काळात माझे कुटुंब आणि चाहत्यांनी मला आनंदी आणि जिवंत ठेवले. या काळात मला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचेच आभार. मी माझ्या आयुष्यात हेच कमावले आहे. माझ्या फॅमिली डॉक्टरांचेही आभार”, असे शिझान खानने म्हटले. 

चाहत्यांकडून काळजी घेण्याचे आवाहन

शिझान खानच्या या पोस्टनंतर अनेक चाहत्यांनी कमेंट करत त्याला काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. शिझानच्या या पोस्टवर अभिनेत्री पूजा भट्टने कमेंट केली आहे. “तुला हसताना पाहून खूप आनंद झाला. तुझा सेन्स ऑफ ह्युमर फारच छान आहे” असे तिने म्हटले आहे. तर अभिनेत्री ऐश्वर्या शर्माने “देव तुला आशीर्वाद देवो”, असे म्हटले आहे. 

दरम्यान शिझान खानने आतापर्यंत छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. शिझान खान हा चांद जलने लगा आणि ‘अली बाबा दास्तान-ए-काबुल’ या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आला. तसेच काही दिवसांपूर्वी तो ‘खतरों के खिलाड़ी 13’ या रिअॅलिटी शोमध्येही झळकला.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *