Headlines

माझ्याशी लग्न करशील? ‘तिने’ विचारलेल्या प्रश्नावर Salman Khan म्हणाला, “20 वर्षांपूर्वी…”

[ad_1]

Salman Khan On Getting Married : बॉलिवूडचा भाईजान आणि सगळ्यांचा लाडका अभिनेता सलमान खान हा सध्या IIFA 2023 मधील व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आहे. दरम्यान, सलमान यावेळी ग्रीन कार्पेटवर मीडियाशी बोलत असताना एका महिलेनं त्यासा अचानक प्रपोज केलं. ती महिला अचानक आली आणि सलमानला म्हणाली, सलमान तू माझ्याशी लग्न करशील का? त्या महिलेनं प्रपोज केल्याचे पाहता सलमाननं त्याच्या अंदाजात तिला उत्तर दिले आहे. सलमान खानचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

सलमानचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत एक महिला अचानक त्याला बोलते की सलमान मी हॉलिवूडवरून फक्त तुला हा प्रश्न विचारायला आली आहे की मी जेव्हा पासून तुला पाहिलं तेव्हापासून मला तू आवडू लागला आहेस. मला तुझ्यावर प्रेम झालं आहे. त्यावर सलमान मध्येच तिला थांबवत म्हणाला, तू शाहरुख खानविषयी बोलत आहेस ना? तेव्हा ती पुढे म्हणाली नाही मी सलमान खान विषयी बोलत आहे. त्यावर ओके असं सलमान म्हणताच ती महिला पुढे त्याला प्रश्न विचारते की माझ्याशी लग्न करशील का? त्यावर त्याच्या अंदाजात उत्तर देत सलमान बोलतो की “माझ्यासाठी लग्न करायचे दिवस संपल्यात जमा आहेत. तू मला 20 वर्षांपूर्वी भेटायला हवी होतीस.” 

सलमाननं दिलेल्या उत्तराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.  कारण सलमानच्या प्रत्येक चाहत्याला त्याच्या लग्नाची ओढ लागली आहे. त्यांना देखील हा प्रश्न आहे की सलमान कधी लग्न करणार. तर या व्हिडीओवर कमेंट ‘त्याला लाज वाटायली हवी तिच्याशी बोलण्यात त्याला काही इन्ट्रेस्ट देखील नव्हता.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘या वयात तो खूप जास्त अॅटिट्यूडमध्ये असल्यासारखा वागतो, सुपरस्टार असल्यानं त्यानं सगळ्यांसोबत चांगल्या प्रकारे वागायला हवं.’ तिसरा नेटकरी म्हणाला, सलमान आता कतरिनाच्या मुलीशी लग्न करेल. आणखी एक नेटकरी म्हणाला, तिला बॉलिवूडमध्ये ब्रेक हवा असेल त्यामुळे तिनं असं केलं.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘तो अजूनही हॅन्डसम दिसतो.’ तिसरा नेटकरी म्हणाला, टाईमपास न करता सलमानच्या अंदाजात उत्तर.’ 

हेही वाचा : Salman Khan च्या बॉडीगार्डनं खरंच धक्का दिला? विकी कौशल नक्की काय म्हणाला ‘त्या’ VIRAL VIDEO बद्दल

सलमानच्या कामाविषयी बोलायचं झाले तर सलमान खान लवकरच ‘टायगर 3’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात सलमानसोबत कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *