Headlines

Hrithik Roshan चे केस गळतात? व्हायरल व्हिडिओतून समोर आले हे सत्य …

[ad_1]

Hrithik Roshan Hair Patch Viral Video: बॉलिवूड कलाकार स्वत:ला सुंदर दिसण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात. तसेच तासनतास जिममध्ये घाम गाळतात, आहाराची काळजी घेतात. ते कपड्यांवर आणि या सगळ्यासाठी खूप खर्च करतात, जेणेकरून ते पडद्यावर परफेक्ट दिसावेत. बॉलिवूडच्या देखण्या कलाकारांचा विचार केला तर हृतिक रोशन  (Hrithik Roshan)याला कसे विसरता येईल. त्याच्या लूकची चर्चा देशातच नाही तर परदेशातही होत आहे. पण नुकताच हृतिकचा असा एक व्हिडिओ समोर आला आहे, तो पाहून अनेकांची झोप उडाली आहे. होय, हँडसम दिसणाऱ्या हृतिकचे असे एक सत्य समोर आले आहे, की तुमच्या पायाखालची जमीन सरकेल.

KRK ने व्हिडिओ शेअर केलाय

अभिनेता आणि  चित्रपट समीक्षक कमाल आर खान  (Kamaal R Khan) हा बॉलिवूड स्टार्सवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नाही. आता यावेळी त्याने हृतिक रोशन याला आपल्या अंगावर घेतले आहे. केआरकेने नुकताच अभिनेत्याबाबत असा खुलासा केला आहे, ज्यानंतर त्याच्या चाहत्यांची झोप उडाली आहे. खरेतर, केआरकेने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर हृतिक रोशनचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये अभिनेता पार्टीला जाताना दिसत आहे. व्हिडिओत हृतिक रोशनला मागून कव्हर करताच त्याच्या डोक्यावर त्वचेचा रंग दिसत आहे. हे पाहिल्यानंतर हृतिक रोशनच्या डोक्याच्या मागच्या बाजूला कमी केस आहेत असे वाटते. याच गोष्टीवर लक्ष केंद्रित करत केआरकेने कॅप्शनमध्ये लिहिले – ‘अरे हृतिक रोशन हेअर पॅच घालायला विसरला.’

चाहत्यांचा हृतिकला पाठिंबा दिलाय

केआरके एवढ्यावरच थांबला नाही, नंतर त्याने आणखी एक ट्विट केले ज्यामध्ये लिहिले होते, ‘माफ करा, जेव्हा हृतिकने त्याचे हेअर पॅच नीट घातले नव्हते.’ हा व्हिडिओ पाहून काही लोकांनी हृतिकला ट्रोल केले तर काही लोक अभिनेत्याचे समर्थन करताना दिसले. काही सोशल मीडिया युजर्सनी कमाल रशीद खानला (Kamaal R Khan) जोरदार सुनावले. हृतिकला सपोर्ट करताना एका यूजरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिले की, ‘हृतिक सरांच्या मेंदूच्या शस्त्रक्रियेनंतर हे घडले, जेव्हा ते जखमी झाले होते. तुमच्या सारख्या खालच्या श्रेणीतील लोकांना हे विचित्र वाटेल,’ नंतर दुसरा यूजर्सेने लिहिलेय, ‘तो 48 वर्षांचा आहे आणि अजूनही सुंदर दिसतो.’ दुसरीकडे काही यूजर्स लिहितात की हे वृद्धत्वाचा परिणाम आहे.

केआरकेचा याआधीही हृतिकवर निशाणा  

याआधी केआरकेने हृतिकच्या आगामी चित्रपटाबाबत असेच वादग्रस्त विधान केले होते. त्याने अलीकडेच अभिनेत्याच्या ‘फायटर’ चित्रपटाचे वर्णन ‘विक्रम वेधा’  असे केले. ज्यावर हृतिकचे चाहते चांगलेच संतापले होते.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *