Headlines

Cyber Security : ज्या वेबसाइटवरुन हजारोंची खरेदी करता ती खरी की फेक ? असे करा माहित, पाहा टिप्स

[ad_1]

नवी दिल्ली: Spot Fake Website: इंटरनेटमुळे बँकिंगसह अनेक महत्वाची कामं सोपी झाली असतानाच सायबर फसवणुकीच्या घटनांमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या काही काळात या घटना अधिक वाढल्या आहेत. इंटरनेटच्या आगमनाने जग खूप वेगाने बदलत असून इंटरनेटने आपल्याला एक आभासी जग दिले आहे, ज्यामध्ये आपली सर्व कामे अगदी सहजपणे होत आहेत डिजिटायझेशन आणि इंटरनेटचा वापर करून, सायबर सुरक्षा कायम राखणे हे भारतीयांसाठी एक मोठे आव्हान आहे. . पण, इंटररनेट वापरताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कारण, आता स्कॅमर्स लोकांना फसवण्यासाठी आणि त्यांच्या खात्यातून पैसे काढण्यासाठी वेग- वेगळ्या पद्धतींचा वापर करत असल्याचे दिसून येत आहे.

वाचा: मस्तच ! Xiaomi च्या 5G स्मार्टफोनवर २५ हजार रुपयांचा ऑफ, सोबत ५ हजार रुपयांची अतिरिक्त सूट

सायबर क्रिमिनल्स यासाठी बनावट वेबसाइट्सचाही वापर करतात. मात्र, काही गोष्टींची काळजी घेतल्यास सायबर फसवणुकीचा हा प्रकार टाळता येऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला बनावट वेबसाइट ओळखण्याच्या काही ट्रिक्स सांगणार आहो, ज्यांच्या मदतीनं तुम्ही होणार फसवणुक टाळू शकता.

वेबसाइट बनावट आहे हे असे माहित करा:

Search Engine मध्ये वेबसाइट Address टाइप करा आणि निकाल रिव्ह्यू करा. वेबसाइटच्या पत्त्यामध्येच अनेक महत्त्वाची माहिती असते, नेहमी ब्राउझिंग, खरेदी, नोंदणी करण्यापूर्वी URL तपासा. तसेच, वेबसाइटचे कनेक्शन प्रकार तपासा आणि वेबसाइट HTTPS वर आहे की नाही याची खात्री करा. कारण, वेबसाइट HTTPS वर सुरक्षितपणे कनेक्ट होते. HTTP नाही.

वाचा: Google ने Play Store वरुन काढून टाकलेले ‘हे’ १३ धोकादायक Apps तुमच्या फोनमध्ये तर नाही, पाहा लिस्ट

चुकीचे शब्दलेखन आणि चुकीचे स्पेलिंग:

वेबसाइट सर्टिफिकेशनआणि ट्रस्ट सील व्हेरिफाय करा. SSL प्रमाणन नेहमी तपासा. ट्रस्ट सील सहसा मेन पेज , लॉगिन पेज आणि चेकआउट पेजवर ठेवले जातात. जर तुम्हाला वेबसाइटवर चुकीच्या इंग्रजीसह चुकीचे शब्दलेखन आणि चुकीचे स्पेलिंग दिसत असतील तर ती खोटी वेबसाइट असू शकते. खराब व्याकरण किंवा विचित्र वाक्प्रचारामुळे साइटच्या अस्सलपणावर प्रश्नचिन्ह निर्माण होतात.

आक्षेपार्ह जाहिराती:

वेबसाइटवर आक्षेपार्ह जाहिराती दिसल्यास सावधगिरी बाळगा. तुम्ही ज्या साइटवर आहात ती आश्चर्यकारकपणे मोठ्या प्रमाणात जाहिराती दाखवत आहे ? या प्रकारची वेबसाइट त्वरित बंद करा. या प्रकारच्या वेबसाइटवरील कोणत्याही जाहिरातीवर तुम्ही चुकून क्लिक केल्यास, तुम्हाला दुसर्‍या बनावट साइटवर रीडायरेक्ट केले जाईल, जी व्हायरस आणि ट्रोजनने भरलेली असते. ही देखील विश्वसनीय साइट नाही, त्यात व्हायरस आणि ट्रोजन देखील असू शकतात.

वाचा: Reliance Jio चे स्वस्तात मस्त प्लान्स ! भरपूर डेटासह युजर्सना मिळतात ‘हे’ फायदे, पाहा लिस्ट

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *