Headlines

Horoscope 18 october 2022 : आज कोणत्या राशीनं सावध व्हायचंय? पाहा आणि तसेच कामाला लागा

[ad_1]

Horoscope 18 october 2022 : आठवड्याची आणि दिवसाची सुरुवात झालीये. अवघ्या पाच दिवसांवर दिवाळीही येऊन उभी आहे. या अशा वातावरणात संपूर्ण माहोल सकारात्मक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मग यात, तुमचा संपूर्ण दिवसही मागे कसा बरं राहील… या नव्या आठवड्याची आणि नव्या दिवसाची सुरुवात करुया आजच्या राशीभविष्याने… 

मेष (Aries Horoscope Today)
नोकरीमध्ये प्रगती करण्याची संधी मिळणार आहे. घरच्या घरी तयार केलेलं अन्न खा. आपल्या माणसांना साथ द्या. 

वृषभ (Today Taurus Horoscope)
एखाद्या लहान कारणामुळं प्रवास करण्याचा योग आहे. कोणाशीही वाद घालू नका. इतरांना मान द्या. 

मिथुन (Today Gemini Horoscope)
नोकरीमध्ये बदल करण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घ्याल. आज धनलाभाचा योग आहे. बिघडलेले नातेसंबंध सुधारणार आहेत. 

कर्क (Cancer Horoscope Today)
वास्तव्यासाठी नवं घर खरेदी कराल. हा दिवस अविस्मरणीय असेल. उगवत्या सूर्याचं दर्शन घेत प्रार्थना करा, सर्व इच्छा पूर्ण होतील. 

सिंह (Leo Horoscope Today)
जोडीदाराला पूर्ण आदर देत त्यांचे सल्ले घ्या. आज हेच सल्ले तुम्हाला पुढे नेणार आहेत. 

कन्या (Horoscope Virgo Today)
मित्रांसोबत फिरायला जाण्याचे बेत आखाल. वडिलांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करु नका, गरजूंची मदत करा. 

तुळ (Libra Horoscope Today)
वैवाहिक आयुष्यात असणारी कटुता दूर होईल. नोकरीमध्ये असणाऱ्या अडचणी दूर होतील. आजचा दिवस शुभ आहे. 

वृश्चिक (Scorpio Horoscope Today)
व्यवसायाणध्ये असणारा तणाव दूर होणार आहे. आपल्या माणसांसोबत वेळ व्यतीत करा. पाहुणे घरात येणार आहेत त्यांचं आदरातिथ्य करा. 

धनु (Sagittarius Horoscope Today)
विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष द्या. कर्जानं घेतलेले पैसे परत मिळणार आहेत. मित्रांसोबत वेळ व्यतीत करण्याची संधी मिळेल. 

मकर (Today Capricorn Horoscope)
एखाद्या मोठ्या बदलाचा विचार तुम्ही करु शकता आयुष्याला कलाटणी देणारी घटना घडेल. 

कुंभ (Today Aquarius Horoscope)
मित्रांशी वाद घालू नका. तुमच्या सर्व समस्या दूर होणार आहेत. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा.

मीन (Pisces Horoscope Today)
मानसिकता बदला, आयुष्य बदलेल. आर्थिक संकटं दूर होणार आहेत. धैर्यानं काम करा. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *