Headlines

Horoscope 13 october 2022 : आज सिंह, कन्या राशीच्या व्यक्तींनी सावध राहा; एकदा कारण वाचून घ्याच

[ad_1]

Horoscope 13 october 2022  : आज 13 ऑक्टोबर, गुरुवार. नवा दिवस, नवी आव्हानं. या आव्हानांची आणि या दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी जाणून घ्या आजच्या या दिवसात तुमच्यासाठी नेमकं काय वाढून ठेवलंय. 

मेष (Aries Horoscope Today)
व्यापाराच्या दृष्टीनं प्रवास कराल. देवाणघेवाणीचे व्यवहार होतील. आज देवाच्या चरणी लाल रंगाचं फूल अर्पण करा. 

वृष (Today Taurus Horoscope)
दिवस थकवणारा असेल. संध्याकाळच्या वेळी मित्रांची साथ तुम्हाला मिळणार आहे. आज एखादी शुभवार्ता कळेल. 

मिथुन (Today Gemini Horoscope)
कोणाचीही खिल्ली उडवू नका, ती वेळ तुमच्यावरही येऊ शकते हे विसरु नका. अभ्यासाकडे लक्ष केंद्रीत करा. 

कर्क (Cancer Horoscope Today)
घरात वाद घालू नका. आज गुळ दान करा, शिवाष्टक वाचा. आजचा दिवस चांगला आहे. 

सिंह (Leo Horoscope Today)
तुमची विचारसरणी बदला. आज इतरांशी संवाद साधताना वाणीवर ताबा ठेवा. एखादी शुभवार्ता कळेल. 

कन्या (Horoscope Virgo Today)
कामाचा व्याप वाढलेला असेल. आरोग्याची काळजी घ्या. आज गुरुची आराधना करा. 

तुला (Libra Horoscope Today)
अती घाईमध्ये वाहन चालवू नका. याचकांना दान करा. आज मित्रपरिवाराची साथ मिळणार आहे. 

वृश्चिक (Scorpio Horoscope Today)
आजचा दिवस थकवणारा असेल. नातेवाईकांची भेट होईल. मोठ्यांचा सल्ला मिळेल. 

धनु (Sagittarius Horoscope Today)
कोणत्याही गोष्टीची विनाकारण चर्चा करु नका. आज आरोग्याची काळजी घ्या. जुने मित्र भेटल्यामुळं आज तुम्ही गतकाळातील आठवणींमध्ये रमाल. 

मकर (Today Capricorn Horoscope)
आजचा दिवस तुमच्या व्यवसायासाठी भरभराटीचा आहे. मोठ्यांचे आशीर्वाद आज फळणार आहेत. 

कुंभ (Today Aquarius Horoscope)
प्रवासयोग आहे. एखाद्या ठिकाणी फिरायला जाण्याचा बेत आखाल. आज कुटुंबाला वेळ द्या. 

मीन (Pisces Horoscope Today)
कोणत्याही कामात आळस करु नका. आज एखादं नवं काम तुमच्या हाती येणार आहे. ते वेळेत पूर्ण करा, लाभ होईल. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *