Headlines

घरबसल्या मिनिटात Aadhaar Card शी लिंक करू शकता Voter ID, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

[ad_1]

नवी दिल्ली:Aadhaar-Voter Id Card Link: सरकारने पॅन आणि आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य केले आहे. आता आधार आणि मतदान ओळखपत्र लिंक गरजेचे आहे. महाराष्ट्रात १ ऑगस्टपासून याच्याशी संबंधित कॅम्पेन सुरू होणार आहे. याबाबत महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी माहिती दिली आहे. त्यांनी माहिती दिली की, मतदारांची ओळख पटवणे आणि मतदार यादीमधील नावांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी असे केले जाईल. राज्य निवडणूक आयोगाने यासाठी कॅम्पस लावले आहेत. ज्यामुळे आधार-मतदान ओळखपत्र लिंक करण्याची प्रोसेस सोपी होईल. तुम्ही घरबसल्या ऑनलाइन देखील प्रोसेस पूर्ण करू शकता. यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

वाचा : WhatsApp वर चॅट करताना मिळेल दुप्पट आनंद, लवकरच येणार ‘हे’ टॉप-५ भन्नाट फीचर्स

तुम्ही जर NVSP च्या वेबसाइटवर रजिस्टर केले नसल्यास, सर्वात प्रथम नवीन यूजर म्हणून रजिस्टर करा. रजिस्टर करण्यासाठी तुम्हाला वेबसाइटवर जावे लागेल. त्यानंतर लॉग इन बटनावर क्लिक करा. पुढे New User Registration या पर्यायावर क्लिक करा. येथे तुम्हाला मोबाइल नंबर आणि कॅप्चा कोड टाका. आता तुम्हाला एक ओटीपी येईल. ओटीपी व्हेरिफाय केल्यानंतर तुम्ही नवीन अकाउंटचा पेजवर पोहचाल. येथे सर्व माहिती भरून रजिस्टर करावे लागेल. रजिस्ट्रेशननंतर तुम्ही पुन्हा लॉग इन पेजवर पोहचाल.

वाचा : एकाच रिचार्जमध्ये संपूर्ण वर्षभराची व्हॅलिडिटी, पाहा Jio-Airtel-Vi पैकी कोणाचा प्लान बेस्ट?

NVSP द्वारे करू शकता लिंक

  • आधार – मतदान ओळखपत्र लिंक करण्यासाठी सर्वात प्रथम NVSP (नॅशनल वोटर सर्विस पोर्टल) ची वेबसाइट https://www.nvsp.in/ जावे लागेल. त्यानंतर येथे लॉग इन करा.
  • आता होम पेजवर दिसणाऱ्या Search in Electoral Roll वर क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल.
  • येथे तुम्हाला मतदान ओळखपत्र, खासगी माहिती, EPIC नंबर आणि स्टेट टाकून सर्च करावे लागेल.
  • तुम्हाला येथे Feed Aadhaar No चा पर्याय मिळेल. यावर क्लिक करा.
  • आता एक पॉप-अप विंडो ओपन होईल. यात तुमच्या आधार कार्डची माहिती द्यावी लागेल.
  • पुढे तुम्हाला महत्त्वाची माहिती भरावी लागेल व ओळख व्हेरिफाय करावी लागेल. त्यानंतर रजिस्टर्ड नंबर आणि ईमेलवर एक ओटीपी येईल.
  • ओटीपी टाकून सबमिटवर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला एक नॉटिफिकेशन मिळेल, ज्यात आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्र लिंक झाल्याची माहिती असेल.

वाचा : Realme चे दोन भन्नाट इयरफोन्स भारतात लाँच, किंमत एवढी कमी की विश्वास बसणार नाही; पाहा डिटेल्स

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *