Headlines

Holi Phone Safety Tips : पाणी आणि रंगाने खराब होणार नाही स्मार्टफोन, या सोप्या टिप्स पाहा

[ad_1]

नवी दिल्लीः होळीचा सण अवघ्या काही तासांवर आला आहे. रंगाची उधळण करण्यासाठी अनेक जणांनी तयारी सुद्धा केली आहे. आपल्या खास मित्र परिवारासोबत होळी आणि धुळीवंदनाचा आनंद एकमेकांसोबत साजरा करण्यासाठी अनेक कर्मचाऱ्यांनी सुट्टी टाकली आहे. किंवा गावाला किंवा जवळच्या व्यक्तीसोबत हा सण साजरा करण्यासाठी तयारी केली आहे. रंगाची उधळण करण्यासाठी दरवर्षी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु, आता हा सण साजरा करताना तसेच रंगाची उधळण करताना आपल्या जवळ असलेला किंवा खिशात असलेला स्मार्टफोन खराब होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. अन्यथा स्मार्टफोन खराब होवू शकतो.

वॉटरप्रूफ कव्हर

आता होळीत फोटो काढायचा असेल तर फोनचा वापर करणे गरजेचे आहे. फोन पाण्यात आणि रंगाने खराब होणार नाही, यासाठी तुम्ही फोनला वॉटरप्रूफ कव्हर लावल्यास फोनला सुरक्षित ठेवता येवू शकते. याने फोन पाणी आणि रंगापासून सुरक्षित राहू शकतो. हे जास्त महाग सुद्धा नसतात. याला तुम्ही कुठूनही १०० रुपये ते १५० रुपये किंमतीत खरेदी करू शकतात.

वाचाः Airtel ला या प्लानमधून Jio चे तगडे आव्हान, महिनाभर वैधता, कॉलिंग आणि डेटाची सुविधा

ग्लास बॅक कव्हर
यासंबंधी तुम्ही ऐकले तर असेल. फोनला पाण्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी ग्लास बॅक कव्हर सुद्धा गरजेचा आहे. हे फक्त पाण्याने नाही तर रंगापासून सुद्धा सुरक्षित ठेवते. तुम्ही ग्लास बॅक कव्हरला ऑनलाइन किंवा ऑफलाइन खरेदी करू शकता.

वाचाः अर्ध्यापेक्षाही कमी किंमतीत मिळतोय Lenovo i3 Laptop, आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट


पॉलिथिनचा करा वापर

या सर्वांसोबत तुम्हाला आणखी एक काम करायचे आहे ते म्हणजे तुम्हाला होळीच्या वेळी नेहमी पॉलिथिन जवळ ठेवायची आहे. यात नेहमी तुमचा फोन ठेवा. यापासून तुमचा फोन सुरक्षित राहू शकतो.

वाचाः १० इंचाचा स्वस्त टॅबलेट भारतात लाँच, रियलमी, रेडमी आणि मोटोच्या Pad ला देणार टक्कर

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *