Headlines

Holi 2023: होळीत रंगाची उधळण करताना स्मार्टफोन, स्मार्टवॉच खराब झालीय? पाहा सोप्या टिप्स आणि ट्रिक्स

[ad_1]

नवी दिल्लीः Holi 2023 to Keep your smartphone safe: आज दिवसभर फक्त रंगाची उधळण करीत होळी आणि धुळीवंदनाचा मनमुराद आनंद लुटला जात आहे. परंतु, हा आनंद लुटला जात असताना आपला स्मार्टफोन खराब होणार नाही, याची काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे. पाणी आणि रंगापासून फोनला कसं सुरक्षित ठेवले जावू शकते. याच्या काही टिप्स तुम्हाला आज आम्ही या ठिकाणी सांगणार आहोत. स्मार्टफोन सोबत स्मार्टवॉचची सुद्धा काळजी घ्यायला हवी. जाणून घ्या डिटेल्स.

Waterproof pouches

छोटे वॉटरप्रूफ प्लास्टिक पाउच, ज्याला नेहमी आपण पावसाळ्यात फोनला सुरक्षित ठेवण्यासाठी वापर करतो. होळीत रंगाची उधळण करण्यासाठी बाहेर पडत असाल तर हे वॉटरप्रूप पाउच नेहमी जवळ ठेवा. यामुळे तुमचा फोन सुरक्षित राहू शकतो. स्वस्त कव्हर, स्क्रीन प्रोटेक्टर आणि कॅमेरा लेन्स प्रोटेक्टरचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. जर फोनच्या कॅमेरा फीचर्सला तुम्ही नुकसान पोहोचू देवू शकत नसाल तर हे सर्व करणे गरजेचे आहे. स्वस्तातील ट्रान्सपेरेंट टीपीयू केसला सहज खराब करू शकतात. त्यामुळे याची काळजी घ्या. याशिवाय, स्क्रीन प्रोटेक्टर आणि कॅमेरा सारख्या महत्त्वाच्या भागात कव्हर करण्यासाठी कॅमेरा लेन्सचा वापर करू शकता. त्यासाठी चांगल्या क्वॉलिटीचा स्क्रीन प्रोटेक्टरचा वापर करा.

Cleaning your phones
जर फोनची काळजी घेवूनही फोनला रंग लागला असेल तर याला स्वच्छ करताना काळजी घ्या. जर फोनला योग्य IP रेटिंग मिळाली आहे. तसेच फोन वॉटर रेजिस्टेंट असेल तर थोडे पाणी शिंपडून फोनला स्वच्छ करू शकता. जर फोनला रंग लागला नसेल तर फोनला एका ओल्या कपड्याने स्वच्छ करू शकता. पोर्ट, बॅक पॅनेलच्या किनाऱ्यावर, स्पीकर ग्रिल आणि मायक्रोनपासून दूर राहा.

Protect your phone’s ports
फोनमध्ये पाणी जाण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे पोर्ट आणि स्पीकर ग्रिल आहे. या पोर्टला कव्हर केल्यानंतर डिव्हाइस मध्ये कोणत्याही प्रकारची धूळ आणि पाणी जात नाही. तुम्ही फ्लॅप, झिपलॉक बॅग आणि रेन प्रोटेक्शन कव्हर द्वारे या कव्हर व पोर्टला कव्हर करू शकतात. तुम्ही डक्ट टेप सोबत फोनच्या पोर्टला सुरक्षित ठेवू शकतात.

वाचाः Airtel ने एकाचवेळी १२५ शहरात लाँच केली 5G सर्विस, आता मिळणार हाय स्पीड डेटा

Never charge your phone when it’s wet
जर तुमचा फोन होळीत रंग खेळताना ओला झाला असेल तर चुकूनही त्या फोनला चार्जिंगला लावू नका. फोनला पूर्णपणे सुखू द्या. नंतर त्याला चार्ज करा. अन्यथा फोनचे नुकसान होवू शकते.

Use protective case for your smartwatches
जर तुम्ही होळीत रंग खेळताना स्मार्टवॉच घातलेली असेल तर तुम्ही प्रोटेक्टिव्ह कव्हरचा वापर जरूर करावा. IP68 रेटिंग असूनही स्मार्टवॉच कलर लागून खराब होवू शकतो. जर तुम्ही प्लास्टिक कव्हर किंवा प्लास्टिक बॅग लॉग बॅगमध्ये ठेवू शकतात.

वाचाः iPhone 13 मिळतोय फक्त ३६ हजारात, ही साइट देत आहे मोठा डिस्काउंट, पाहा ऑफर

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *