Headlines

‘हिंमत असेल तर मैदानात या’, जाहीर आव्हान देणाऱ्या उद्धव ठाकरेंना शिंदे गटाने दिलं उत्तर, म्हणाले “आम्ही कुठे घऱात…” | Shinde vs Thackeray Sandipan Bhumre on Shivsena Uddhav Thackeray Challenge sgy 87

[ad_1]

‘हिंमत असेल मैदानात या, मी मैदानात उतरलो आहे’, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला जाहीर आव्हान दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त षण्मुखानंद सभागृहात आयोजित ‘अमृत महोत्सव’ कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे आव्हान दिलं. यावेळी त्यांनी शिंदे गटाला लक्ष्य केलं. मर्दांच्या हाती मशाल आहे असंही म्हटलं. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या या आव्हानाला आता शिंदे गटानेही उत्तर दिलं आहे.

Shinde vs Thackeray: शरद पवारांसमोरच उद्धव ठाकरेंचं शिंदे गटाला जाहीर आव्हान, मंचावरुनच म्हणाले “हिंमत असेल तर एका…”

शिंदे गटातील संदीपान भुमरे यांना प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंच्या आव्हानला उत्तर दिलं. ते म्हणाले “आम्हीपण मैदानातच आहोत, घरात बसलेलो नाही. हे अडीच वर्षं घरात बसले होते, तेव्हाही आम्ही मैदानात होतो आणि आत्ताही आहोत. हे आमच्यामुळे अडीच वर्षानंतर मैदानात आले आहेत. ही क्रांती झाली नसती तर अजून अडीच वर्षं घरातच बसून राहिले असते. कोण कोणाल काय दाखवतं हे अडीच वर्षानंतर कळेलच”.

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले आहेत?

“प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला न्यायालयात जावं लागत आहे. मैदानासाठीही न्यायालयात जावं लागलं. हिंमत असेल तर तुम्ही मैदानात या, माझी तयारी आहे. मी मैदानात उतरलो आहे. आम्हाला मैदान कसं मिळणार नाही यापेक्षा एका मैदानात, व्यासपीठावर येऊ आणि काय व्हायचं ते होऊन जाऊ दे”, असं जाहीर आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *