Headlines

प्रेग्नंन्सीमध्ये उंच टाचांचा चपला घातल्यानं बिपाशाला पाहून नेटकरी चिंतेत!, म्हणाले… video viral

[ad_1]

Bipasha Basu Viral Pregnancy Video:  अभिनेत्री बिपाशा बासू सध्या आपल्या प्रेग्नंन्सीमुळे चर्चेत आहे. तिचे प्रेग्नंन्सी व्हिडीओज हे कायम चर्चेत असतात. तिच्या प्रेग्नंन्सी फोटोशूटनंतर तिचे प्रेग्नंन्सी व्हिडीओज खूप जास्त चर्चेत आले आणि क्षणार्धात व्हायरल झाले. आपल्या प्रेग्नंन्सीतही बिपाशा चांगलीच चर्चेत आली आहे. सध्या बिपाशा एका कार्यक्रमानिमित्त स्पॉट झाली आणि या तिच्या व्हायरल होणाऱ्या तिच्या व्हिडीओची सध्या सर्वत्र चर्चा आहे. (netizens trolls bollywood actress bipasha basu for wearing high heels in pregnancy video viral)

हेही तितकेच खरे आहे सध्या बिपाशा आपला प्रेग्नंन्सीचा वेळ एन्जॉय करताना दिसते आहे. लवकरच बिपाशा आणि करण सिंग ग्रोवर त्यांच्या पहिल्या पाल्यांचे स्वागत करतील. बिपाशा नुकतीच बांद्रा भागात स्पॉट झाली. परंतु यावेळी मात्र प्रेग्नंन्ट बिपाशाला पाहून चाहते थोडे नाराज झाले. 

बिपाशाचं स्टाईलिंग नेहमीच उजवं असतं तिच्या स्टाईलिंगला खूप जण फोलो करतात. तिचे फ्रेश फोटोज नेहमीच व्हायरल होत असतात यावेळी तिचा नवा लुकही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला परंतु एका चुकीमुळे नेटकऱ्यांनी तिला फैलावर घेतले पण तेही तिच्या काळजीपोटी… तिचा नवा लुक पाहून चाहते तिच्यावर खुश तर झालेच पण खोडेसे नाराजही झाले, बिपाशानं यावेळी मॅटर्निटी फॅशन केली होती. तिनं केशरी रंगाचा प्रिटेंड कफ्तान स्टाईल मॅक्सी ड्रेस परिधान केला होता. तिनं केस मोकळे सोडले होते आणि लाईट मेकअप केला होता. ती या लुकमध्ये खुपच क्यूट दिसत होती. 

मात्र, बिपाशा बसूच्या या फोटोंनी चाहत्यांची चिंता वाढवली. कारण आपला मेटर्निटी लुक कॅरी करतानाच तिनं पेन्सिल हिल्स देखील घातल्या होत्या. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे बिपाशाचे चाहते तिला कमेंट्समध्ये चांगल्याच सूचना करत आहेत. 

सोशल मीडियावर बिपाशाच्या फोटोंवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले – ‘हिल्स घालू नका, प्रेग्नेंसीमध्ये ते सुरक्षित नाही’. याशिवाय आणखी एका यूजरने लिहिले- ‘असे करू नका, यात तुम्हाला धोका आहे’.

एकूणच तिचे चाहते ती प्रेग्नंट असल्यानं तिनं हिल्स घालणं चुकीचं आहे असा सल्ला देत आहे. असं करणं तुमच्यासाठी सुरक्षित नाही असंही सांगत आहेत. त्याचबरोबर बिपाशा मात्र या हिल्स घालूनही फार कम्फर्टेबल दिसते आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *