Headlines

हे पण स्ट्रगलच… श्रीदेवीच्या मुलीच्या वाट्याला सुद्धा आली ‘ही’ गोष्ट

[ad_1]

मुंबई : बॉलीवूडच्या पुढच्या पिढीतील स्टार्स सुहाना खान, खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा हे स्टार किड चित्रपटात पदार्पण करण्यासाठी सज्ज आहेत.

तिघेही दिग्दर्शिका झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ ( The Archies ) या चित्रपटात काम करत आहेत. बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या बॉलिवूड डेब्यूची चर्चा होती आणि आता अखेर या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.

श्रीदेवीची मुलगी खुशी कपूर सिनेमात झळकणार असल्याचं समोर आल्यापासूनच ती फिटनेससाठी विशेष मेहनत घेताना दिसत आहे. पण एकीकडे सिनेमात दिसण्यासाठी तिचा संपुर्ण ग्लॅमरस लूक तिला बदलावा लागला आहे.

खऱ्या आयुष्यात खूशी खूपच हॉट आणि ग्लॅमरस आहे. पण सिनेमातील भूमिकेसाठी तिला स्वत:ला पूर्णपणे बदलावं लागल्याचं बोललं जात आहे. केसांपासून ते कपड्यांपर्यंत आतापर्यंत खुशी अशा अवतारात कधीच दिसली नव्हती. अनेकांसाठी तिचा हा फोटो चकीत करणारा ठरत आहे. पण खुशीने स्वत:वर मेहनत घेत पहिल्याच सिनेमातील लूकनं सगळ्यांनच लक्ष वेधलं आहे.

प्रत्येक कलाकाराला भूमिका साकारत असताना स्वत:मध्ये अनेक प्रकारे बदल करावा लागतो. तसंच काहीसं आता श्रीदेवीच्या लेकीच्या वाट्याला सुद्धा आलं असल्याचं बोललं जात आहे.

सुहाना खान, खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा द आर्चीजच्या सेटवर दिसले. सोशल मीडियावर आता प्रत्येकाचे लूक लीक झाले आहेत. तपकिरी केसांसह अजब अवतारात दिसलेल्या खुशी कपूरला ओळखणं अनेकांसाठी कठीण झालं आहे. तर बिग बींचा नातू अगस्त्य नंदा कुरळे केसांसह ब्लाऊन कलरच्या पोशाखात दिसत आहे.

तर सुहाना खान काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. लीक झालेले फोटो सिनेमाच्या शूटिंगच्या पहिल्या दिवसाचे असल्याचे सांगण्यात येत आहेत.

झोया अख्तरच्या या चित्रपटात संजय कपूरचा मुलगा जहान कपूरही दिसणार आहे. जहानचाही हा पहिलाच चित्रपट आहे. हा चित्रपट आर्चीज कॉमिक्सवर आधारित आहे. यामध्ये सुहाना खान वेरोनिका लॉजची भूमिका साकारताना दिसणार आहे. 

 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *