Headlines

अरेरे! मधुबाला यांच्या अखेरच्या दिवसांमध्ये इतकी वाईट अवस्था, पतीलाही त्यांच्यासाठी नव्हता वेळ

[ad_1]

मुंबईः आज बॉलीवूडची दिग्गज स्टार मधुबालाबदद्दला जाणून घेऊयात जी आता आपल्यात नाही. मधुबालाचं नाव इंडस्ट्रीतील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक होतं. मात्र, वयाच्या 36 व्या वर्षी मधुबाला यांनी एका आजारामुळे हे जग सोडले.

त्या काळातील प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांच्याशी मधुबालाचा विवाह झाला होता. असं सांगितलं जातं की, मधुबाला तिच्या आजारावर उपचार घेण्यासाठी लंडनला जात होती, लंडनला जाण्यापूर्वी किशोर कुमारने तिला लग्नाचा प्रस्ताव दिला होता. यानंतर किशोर कुमार आणि मधुबाला लग्न करून एकत्र लंडनला गेले.

मात्र, लंडनमध्ये मधुबालाची तपासणी करताच डॉक्टरांनी तिला दोन वर्षांपेक्षा जास्त वेळ नसल्याचे सांगितले होते. अनेक वर्ष मधुबालाने गंभीर आजाराशी लढा दिला.

मधुबालाची बहीण मधुर सांगते की, ‘किशोर कुमार त्यांच्या कामात खूप व्यग्र असायचे आणि मधुबालाला भेटायला त्यांच्याकडे वेळही नसायचा. ‘मधुबालाचा बहुतेक वेळ एकाकीपणात अश्रू ढाळण्यात गेला’.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, किशोर कुमारच्या आधी मधुबालाचे नाव दिलीप कुमार यांच्यासोबतही जोडले गेले होते. एकेकाळी दिलीप साहब आणि मधुबाला, ज्यांचे खरे नाव बेगम मुमताज जहाँ देहलवी होते, ते दोघेही त्यांच्या नात्याबाबत गंभीर होते. मात्र, काही कारणांमुळे त्यांचे लग्न होऊ शकले नाही.

दिलीप कुमार आणि मधुबाला यांच्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये मुगल-ए-आझम, अमर, संगदिल आणि तराना यांचा समावेश आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *