Headlines

धर्मेंद्र यांनी लपवली होती हेमा मालिनी यांची पहिली प्रेग्नंसी; ईशाच्या जन्मावेळी बूक केलं होतं अख्खं हॉस्पिटल

[ad_1]

बॉलिवूडमधील पडद्यावरील आणि पडद्यामागील प्रसिद्ध जोडप्यांची नावं घ्यायची असतील तर हेमा मालिनी आणि धर्मेंद्र हे नाव घेतल्याशिवाय ती यादी पूर्ण होणार आहे. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र 1980 मध्ये विवाहबंधनात अडकले. मात्र यावेळी धर्मेंद्र आधीपासूनच विवाहित होते. पण त्यांना आपल्या पहिल्या पत्नीला सोडचिठ्ठी द्यायची नव्हती. यामुळे अखेर त्यांनी धर्म बदलून दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. 1981 मध्ये धर्मेद आणि हेमा मालिनी यांच्या पहिल्या बाळाचं आगमन झालं. पण त्यावेळी हेमा मालिनी गर्भवती असल्याची माहिती लपवून ठेवण्यात आली होती.  घरातील काही मोजके कुटुंबीय आणि जवळचे मित्र वगळता कोणालाही याची माहिती नव्हती. 

हेमा मालिनी यांना जेव्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, तेव्हा धर्मेंद्र यांनी माहिती गोपनीय ठेवण्याच्या हेतूने शक्य ते सर्व प्रयत्न केले होते. त्यावेळी त्यांनी पत्नीसाठी संपूर्ण रुग्णालयाच बूक केलं होतं, जेणेकरुन हेमा मालिनी यांना कोणताही त्रास होऊ नये. चाहत्यांना माहिती मिळाली तर ते रुग्णालयाबाहेर गर्दी करतील अशी त्यांना भीती होती.

हेमा गर्भवती असल्याचं कोणालाच माहिती नव्हतं – नीतू कोहली

प्रसिद्ध टीव्ही चॅट शो ‘जीना इसी का नाम है’च्या एका एपिसोडमध्ये हेमा मालिनी यांच्या मैत्रीण नीतू कोहली पोहोचल्या होत्या. यावेळी त्यांनी सांगितलं होतं की, जेव्हा ईशाचा जन्म होणार होता, तेव्हा कोणालाही हेमा मालिनी गर्भवती असल्याची माहिती नव्हती. ईशासाठी धरमजींनी सगळं हॉस्पिटल बूक केलं होतं. हे जवळपास 100 खोल्यांचं नर्सिंग होम होतं. धर्मेंद्र यांनी सर्व 100 खोल्या बूक केल्या होत्या. 

नीतू यांनी पुढे सांगितलं होतं की, त्यावेळी धर्मेंद्र यांच्या या निर्णयाची कोणालाही माहिती नव्हती. धरमजी यांनी असं काही केलं आहे याची कोणाला जाणीव नव्हती. 2 नोव्हेंबर 1981 रोजी ईशा देओलचा जन्म दिला. 

धर्मेंद्र यांच्या आईने घेतली होती हेमा मालिनी यांची भेट

राम कमल मुखर्जी यांनी लिहिलेली बायोग्राफी ‘हेमा मालिनी: बियॉन्ड द ड्रीम गर्ल’मध्ये अभिनेत्रीने आपली सासू सतवंत कौर यांच्यासह झालेल्या भेटीचा उल्लेख केला आहे. हेमा मालिनी आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणार होत्या, तेव्हा त्या कशाप्रकारे भेटायला आल्या होत्या याची माहिती त्यात देण्यात आली आहे. कुटुंबातील कोणालाच न सांगत त्या भेटायला आल्या होत्या अशी माहिती हेमा मालिनी यांनी दिली होती. 

हेमा मालिनी यांनी सांगितलं होतं की “धर्मेंद्र यांची आई सतवंत कौर फार दयाळू होत्या. मी जेव्हा ईशाला जन्म देणार होती तेव्हा त्या जुहूमधील डबिंग स्टुडिओत मला भेटायला आल्या होत्या. त्यांनी घरात कोणालाच काही सांगितलं नव्हतं. मी त्यांच्या पाया पडल्यानंतर त्यांनी माझी गळाभेट घेतली होती. आनंदी राहा असा आशीर्वाद त्यांनी दिला होता. मला त्या गोष्टीचा फार आनंद आहे”.

धर्मेद्र यांच्या पहिल्या पत्नीला भेटल्या होता हेमा

पुस्तकात हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांच्या भेटीचाही उल्लेख केला आहे. एका जाहीर कार्यक्रमात आमची भेट झाल्याचं त्यांनी सांगितलं होतं. पण लग्नानंतर हेमा मालिनी यांनी त्यांच्यापासून अंतर ठेवलं होतं. 

“मला कोणालाही त्रास देण्याची इच्छा नाही. धरमजींनी मला आणि माझ्या मुलींना फार काही दिलं आहे. मला त्याचा आनंद आहे. त्यांनी एक वडील होण्याचं कर्तव्य पूर्ण केलं आहे,” असं हेमा मालिनी यांनी सांगितलं होतं. तसंच मी त्यांच्या पहिल्या पत्नीचा आदर करत असल्याचं सांगितलं होतं. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *