Headlines

बार्शी तालुक्यात पावसाची दमदार हजेरी , शेतकर्‍यांच्या अडचणीत वाढ

शेतात पाणी साचल्याने सोयाबीन पिकाचे नुकसान

बार्शी/हनुमंत गायकवाड – अनेक दिवसाच्या विश्रांतीनंतर बार्शी शहर व तालुक्यात वरुणराजा मनसोक्त बरसला आहे. आज पहाटे पासूनच पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसाने पांगरी ,पाथरीसह चहुबाजूचा परिसर जलमय झाला आहे. पाथरी लघु प्रकल्प साठवण तलाव ओसंडून वाहत आहे.

पाथरी येथील साठवण तलाव

पाथरी भागात अत्यल्प प्रमाणात पाऊस झाला होता.पावसाच्या आशेवर बळीराजाने पेरणीची कामे उरकून घेतली होती. अत्यल्प पावसावर पिके कशीबशी तग धरून होती. मात्र काल रात्री व पहाटे झालेल्या पावसाने खरीप हंगामातील हाततोंडाशी आलेला घास हिराऊन घेतला आहे.


पावसाने पिकाचे नुकसान झाले असल्यास पीक विमा कंपनीला 72 तासाच्या आत तक्रार करावी लागते. सगळ्या शेतकर्‍यांना विमा कंपनीकडे ऑनलाइन तक्रार करणे शक्य होत नाही. पाथरी भागातील शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे कृषि विभागाने करून तसा अहवाल विमा कंपनीकडे सादर करावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे. मात्र कृषि विभाग पीक विमा कंपनीला ऑनलाइन तक्रार करण्यास सांगत आहे.

विविध उपाययोजना कराव्यात ….


पाथरी येथील शेतीचा 50℅पेक्षा जास्त शिवार हा नदीपात्राच्या पलीकडे आहे. व नदीला पूर आल्यामुळे कमीत कमी 5ते6 दिवस नदीच्या पलीकडे शेतात जाता येते नाही. त्यामुळे विमा कंपनी कडे तक्रार करण्यासाठी 72 तासांच्या आत फोटो लोकेशन घेता येत नाही. तरी यावरती शासकीय विभाग कडून उपाययोजना कराव्यात.
प्रतीकेत गायकवाड- शेतकरी मौजे पाथरी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *