Headlines

लोणावळा, मावळ परिसरात मुसळधार पाऊस; पूल पाण्याखाली गेल्याने नागरिकांचा जीवघेणा प्रवास | Heavy rain in Lonavala Maval area Citizens travel dangerously as bridges go under water msr 87 kjp 91

[ad_1]

लोणावळ्यात मुसळधार पाऊस सुरू असून २४ तासात तब्बल २३४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. आत्तापर्यंत चालू वर्षात १९६९ मिमी येवढा पाऊस झाला असून तो गेल्या वर्षी च्या तुलनेत अधिक आहे. गेल्या वर्षी आत्तापर्यंत केवळ १३४८ मिमी येवढा पाऊस कोसळला होता. मावळ मध्ये देखील धुवादार पाऊस झाला असून पांढरे शुभ्र धबधबे पर्यटकांना आकर्षित करत आहेत. काही ठिकाणी रस्ता खचल्याने काही गावांचा संपर्क तुटलेला आहे. 

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी कालावधीत जास्त पाऊस –

पर्यटनस्थळ लोणावळ्यात धुवादार पाऊस झाला असून परिसराला अक्षरशः झोडपून काढलं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी कमी अवधी मध्ये जास्त पाऊस झाला आहे. यावर्षी चालू वर्षात तब्बल 1969 मिमी येवढा पाऊस कोसळला आहे. तोच गेल्या वर्षी आत्तापर्यंत केवळ १३४८ मिमी येवढा होता. म्हणजे जून महिन्यात पावसाने दडी मारली, परंतु जुलै च्या पहिल्याच आठवड्यात जोरदार हजेरी लावत अवघ्या १२- १३ दिवसांमध्ये सर्वत्र पाणीच पाणी केलं आहे. धरण, नदी, नाले ओसंडून वाहत आहेत.

खडकवासला धरणातून ४७०८ क्युसेकने विसर्ग; धरणक्षेत्रात पाऊस कायम

…त्याच पुलावरून इतर आठ गावातील नागरिक देखील प्रवास करतात –

मावळात देखील काही वेगळी परिस्थिती नाही. नदी, नाले, ओढे दुथडी भरून वाहत आहेत. दरम्यान, इंद्रायणी नदीच्या पाण्याखाली पूल गेल्याने वाडीवळे, कामशेत येथील नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्याच पुलावरून इतर आठ गावातील नागरिक देखील प्रवास करतात. इंद्रायणी नदीचा आणखी पाणी वाढल्यास या गावचा संपर्क तुटतो, अशी परिस्थिती आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *