Headlines

अतिवृष्टी, वीजबिल ते कृषीपंप पुरवठा, शेतकऱ्यांसाठी शिंदे सरकारचा प्लॅन काय? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं; म्हणाले… | devendra fadnavis gives information about heavy rain electricity bill farmers help planning of state government

[ad_1]

राज्यात सध्या पश्चिम महाराष्ट्रपासून ते विदर्भापर्यंत अतिवृष्टी झाली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. सध्याचे नैसर्गिक संकट लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. यावेळी संकटात सापडलेल्या नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिली. राज्य सरकार ग्रामीण भागातील वीज पुरवठा, पाणी पुरवठा योजना तसेच शेतकऱ्यांना कृषीपंप पुरवठा यासाठी वेगवेगळ्या योजनांवर काम करणार असल्याची माहितीही फडणवीस यांनी आज दिली. ते पत्रकारांशी बोलत होते.

हेही वाचा >>> उद्धव ठाकरेंनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर शिदें गटाकडून पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “आम्हाला अभिमान, त्यांनी…”

“पैसे न भरल्यामुळे काही गावांचा वीजपुरवठा तोडण्यात आला आहे. या संदर्भात आम्ही आज बैठक घेतली. २०१८ साली आपण मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजना सुरु केली होती. दिवसा शेतकऱ्यांना वीज देण्याचे नियोजन होते. त्या काळात साधारण २०० मेगावॅटचं काम आपण पूर्ण केलं होतं. तर काही काम प्रगतीपथावर होतं. नंतरच्या काळात त्याला थोडा ब्रेक लागला होता. ही योजना आम्ही पुन्हा एकदा फास्ट ट्रॅकवर आणली आहे. पुढच्या एका वर्षात किमान ३० टक्के अॅग्रीकल्चर फिडर सौरउर्जेवर कसे आणता येतील, यावर आम्ही निर्णय घेतला आहे. त्याचा संपूर्ण आराखडा मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेसाठी आम्ही पाठवत आहोत,” अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

हेही वाचा >>> ..अन् वसंत मोरे पोहोचले भाजपा कार्यालयात, मुरलीधर मोहोळ यांनी शेअर केले फोटो

तसेच, ग्रामीण भागातील वीजबिल थकबाकी आणि पाणी पुरवठा योजनेबद्दलही फडणवीस यांनी राज्य सरकारची भूमिका मांडली. “अनेक भागात पिण्याच्या पाण्याच्या योजना, तसेच पथदिवे बील न भरल्यामुळे बंद आहेत. या बिलावर व्याज वाढत असल्यामुळे महावितरणची थकबाकी वाढत आहे. गावानांदेखील अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे जुनी सगळी थकबाकी एकरकमी भरणा करण्याच्या दृष्टीने महावितरण आणि राज्य सरकारने विचार करुन राज्य सरकारने ही थकबाकी भरावी. राज्य सरकारने केलेल्या मदतीतून ग्रामपंचायतींनी बिलं भरावीत आणि योजना सुरु कराव्यात, याबाबतही एक निर्णय घेतला आहे,” असे फडणवीस यांनी सांगितले.

हेही वाचा >>>“…म्हणून मी राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकलो”, गुरूपोर्णिमेनिमित्त एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली भावना

“२०१९ सालापासून सव्वा लाख शेतकऱ्यांनी कृषी पंपांसाठी अर्ज केलेला आहे. या सर्वांना केंद्र सरकारची कुसुम आणि राज्य सरकाच्या योजनेच्या मध्यमातून जेथे शक्य आहे तिथे सोलार पंप देण्याची योजना तयार करुन मुख्यमंत्र्यांकडून सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. उपसा सिंचन योजना सौरउर्जेवर कशा चालवल्या जातील, यावर विचार सुरु आहे. या योजनेसाठी आज सात रुपयांना वीज पडते. आपण एक रुपया तीस पैसे वसूल करतो. बाकीची सबसीडी देतो. सौरउर्जा तयार केली, तर आपल्याला वीज ३ रुपये २० पैशांना पडेल. साधरणपणे आपल्याला चार रुपयांची बचत करता येईल. याबाबतही प्रस्ताव तयार करण्यास सांगण्यात आलं आहे,” असेही फडणवीस यांनी सांगितले.

हेही वाचा >>> गुरुपौर्णिमा म्हणजे निष्ठा आणि विश्वास – खासदार राजन विचारेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा!

पुढे बोलताना फडणवीस यांनी राज्यातील अतिवृष्टी आणि अतिवृष्टीबाधित लोकांच्या मदतीसाठी राज्य सरकार काय पावलं उचलत आहे, याबाबत माहिती दिली. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे, त्या ठिकाणाचे पंचनामे करण्याचा आदेश दिला आहे. ज्या ठिकाणी कोणी मृत्युमुखी पडला असेल, तिथे एनडीआरएफच्या माध्यमातून मदत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त सातत्याने आढावा घेऊन त्या त्या ठिकाणी आवश्यक त्या सोईसुविधा उपलब्ध करण्याबाबतही निर्देश देण्यात आले आहेत,” असे फडणवीस यांनी सांगितले.

हेही वाचा >>> राष्ट्रपती निवडणूक : “…तर चांगले झाले असते”, द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेने पाठिंबा देताच फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

“लोकांची राहण्याची, खाण्याची चांगली सोय करा. थोडाजरी धोका असेल तिथे आगावीची जागा तयार करुन ठेवा. लोकांचा सुरक्षित ठिकाणी हलवा. ज्यामुळे संपत्ती तसेच माणसांचे नुकसान होणार नाही, असेदेखील मुख्यमंत्र्यांनी गडचिरोली येथे दौऱ्यावर असताना स्पष्टपणे सांगितलं आहे,” अशी माहिती फडणवीस यांनी दिली.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *