Headlines

सुनावणी पुढे ढकलल्याने शिंदे सरकारवर टांगती तलवार?; मुनगंटीवार म्हणतात, “शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांना भाजपाने…” | Supreme Court posts hearing of Thackeray vs Shinde on August 1 bjp leader sudhir mungantiwar reacts scsg 91

[ad_1]

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचे भवितव्य ठरवणाऱ्या याचिकेची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने १ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलल्याने राज्यातील शिंदे आणि भाजपा सरकारवर कोणतंही संकट नसल्याचं भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय. (येथे वाचा लाइव्ह अपडेट) सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंना आपले मुद्दे मांडण्यासाठी पुढील बुधवारपर्यंत (२७ जुलै) वेळ दिला असून प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. १ ऑगस्टला सुनावणी होणार असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केल्यानंतर मुनगंटीवार यांनी न्यायालयीन लढाई सुरु असणारे तिन्ही मुद्दे हे आमदार अपात्र ठरवण्यासंदर्भातील नसल्याचं म्हटलंय.

नक्की पाहा >> Photos: “उद्धव आणि आदित्य ठाकरेंच्या आदेशानेच पवारांवर पातळी सोडून टीका”; बापाचा उल्लेख करत अजित पवारांनी इशारा दिलेल्या नेत्याचा गौप्यस्फोट

“१ ऑगस्ट तारीख दिली आहे न्यायालयाने तर टांगती तलवार आहे असं म्हणता येईल?” असा प्रश्न मुनगंटीवार यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्यांनी, “नाही, याचा टांगती तलवारशी काहीही संबंध नाहीय. सरकारच्या स्थिरतेशी, अस्थिरतेशी काहीही संबंध नाहीय,” असं स्पष्ट केलं. पुढे बोलताना मुनगंटीवार यांनी विरोधकांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला. “काही लोक स्वत:च्या मनामध्ये असा भाव निर्माण करुन आनंद घेत आहेत. ती त्यांची सवय झालीय,” असं ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना म्हणाले.

नक्की वाचा >> सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी १ ऑगस्टला : राज्यात पुढील ११ दिवस दोघांचेच सरकार? मंत्रिमंडळाचा विस्तार, अधिवेशनबाबत अनिश्चितता

न्यायप्रविष्ठ असणाऱ्या याचिकांमध्ये तीन मुख्य मुद्दे असल्याचं त्यांनी सांगितलं. “सर्वोच्च न्यायालयात जो विषय आहे त्यात अजूनपर्यंत कोणताही आमदार अपात्र झालेला नाही. कायदेशीर बाबींवर बोलायचं झालं तर उपाध्यक्षांवर अविश्वास असताना ते आमदारांना अपात्र करण्याची नोटीस देऊ शकतात का?,” याबद्दल निर्णय न्यायालय करणार आहे असं मुनगंटीवार म्हणाले.

नक्की वाचा >> “जसं काही त्यांचं…”; नातवाचा उल्लेख करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेवरुन उद्धव ठाकरेंना टोला

“जी नोटीस दिली, जो व्हिप लागू आहे असं सांगितलं तो फक्त विधानसभेच्या कामाकाजामध्ये मतदानाच्या वेळी लागतो. पक्षाच्या बैठकीत व्हिप लागत नाही यावर त्यांना निर्णय करायचाय,” हा दुसरा प्रश्न न्यायालयामधील निकालामध्ये चर्चेत असल्याचं मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे, “४८ तासांची जी मुदत दिली होती ती न्यायाला धरुन आहे, अन्यायकार आहे की पुरेशी आहे हे ठरवायचं आहे,” असंही मुनगंटीवार म्हणाले. “या तिन्हींमध्ये काहीही निर्णय झाला तरी कोणताही आमदार अपात्र होत नाही,” असं मुनगंटीवार यांनी म्हटलंय.

नक्की वाचा >> “…त्या दिवशी भाजपा बंडखोरांना बाजूला करेल”; शिंदे गटासंदर्भात उद्धव ठाकरेंचं भाकित

“कोणताही आमदार फुटलाच नाही. ते शिवसेनाच आहेत. खरी शिवसेना आमची आहे असं ते सांगतायत. आमच्याकडे बहुमत असल्याने खरी शिवसेना आमची आहे असं ते म्हणतातय. त्यांनी भाजपाच्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिलेला नाहीय. शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांना भाजपाने पाठिंबा दिलाय,” असं मुनगंटीवार यांनी बंडखोर आमदार हे शिवसेनेचाच भाग असल्याचा युक्तीवाद करताना म्हटलं. त्याचप्रमाणे पुढे बोलताना मुनगंटीवार यांनी, “आता निवडणूक आयोगाला एक ठरवावं लागेल की शिवसेना कार्यकर्त्यांच्या हक्काची आहे की शिवसेना व्यक्तीगत मालकीची आहे,” असंही म्हटलं.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *