Headlines

श्रवण यंत्राच्या उपयोगामुळे जीवनमान सुसह्य होण्यास मदत – पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

[ad_1]

बुलडाणा, (जिमाका) दि.25 : राज्यातील सर्वसामान्य लोकांचे जीवनमान सुधाराण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी दिव्यांग, कर्णबधीर यांचे जीवन सुसह्य होण्यासाठी आज 25 जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मोफत श्रवण यंत्र वाटप या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातही कार्यक्रम प्रत्येक तालुक्यात व प्रत्येक गरजवंतांना याचा फायदा व्हावा, अशी आमची भावना आहे. त्या अनुषंगाने गरजवंतांनी या श्रवण यंत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, स्वरूप चॅरिटेबल फाउंडेशन, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र औरंगाबाद, महात्मा गांधी सेवा संघ औरंगाबाद,  बुलडाणा जिल्हा नियोजन निधी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डिजिटल श्रवण यंत्र वाटप कार्यक्रमाचे आयोजन सिंदखेड राजा स्थित काळा कोट येथील संग्रहालय येथे करण्यात आले. त्यावेळी पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर नगराध्यक्ष सतीश तायडे, उपनगराध्यक्ष विजुभाऊ तायडे,  जि.प समाज कल्याण सभापती सौ पुनमताई राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक श्री. तडस, उपविभागीय अधिकारी भूषण आहिरे, तहसीलदार सुनील सावंत,  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे जिल्ह्याचे नरेश  शेळके, पंचायत समिती सभापती सौ मीनाताई बंगाळे, जि.प सदस्य सर्वश्री दिनकर बापू देशमुख, राम जाधव, पंचायत समिती माजी सभापती शिवाजीराजे जाधव, सतीश काळे, सीताराम चौधरी, शाम मेहत्रे, गणेश झोरे, शेख आजीम, पंचायत समिती माजी उपसभापती सुनील जगताप आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. संचालन ॲड संदीप मेहेत्रे यांनी तर आभार प्रदर्शन राजेंद्र अंभोरे यांनी मानले.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *