Headlines

Havan Upay: हवनमधील राख असते प्रभावशाली, ‘या’ उपयांमुळे आर्थिक स्थिती सुधारेल!

[ad_1]

Benefit Of Havan Rakh: हिंदू धर्मात पूजा विधीसोबत हवन करण्याची प्राचीन परंपरा आहे. हवन विधी केल्याने घरात सकारात्मक उर्जा संचारते आणि नकारात्मक उर्जेचा नाश होतो. हवनामुळे घरातील वातावरण शुद्ध होतं. ज्योतिषशास्त्रानुसार पूजेवेळी हवन करणं शुभ मानलं गेलं आहे. यामुळे पूजेचं पूर्ण फळ मिळतं. हवन करताना सर्व सामग्री असणं आवश्यक आहे. हवन सामग्रीत अनेक वस्तूंचा समावेश असतो. शास्त्रानुसार हवन करताना अग्नित हवन सामग्रीची आहुती दिली जाते. हवनातून निघालेल्या धुरामुळे वातावरण शुद्ध होतं. हवनानंतर राखेचं विशेष महत्त्व सांगितलं गेलं आहे. हवनातील राखेबाबत ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितले गेले आहेत. यामुळे आर्थिक चणचण दूर होऊन देवी लक्ष्मीचा वास घरात राहतो. त्यामुळे हवन झाल्यानंतर अनेक घरात राख व्यवस्थितरित्या सांभाळून ठेवली जाते. काही जण ही राख वाहत्या पाण्यात सोडून देतात.

चला जाणून घेऊयात हवनमधील राखेचे चमत्कारिक उपाय…

-वास्तुशास्त्रानुसार हवनातील राखेत नकारात्मक उर्जेला रोखण्याची शक्ती असते. त्यामुळ हवनातील राख फेकण्याऐवजी व्यवसाय स्थळ किंवा घराच्या चारही बाजूंना फेकल्यास नकारात्मक उर्जा दूर होते. 

-अनेक घरांमध्ये तेल आणि मिठाच्या मदतीने नजर काढली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार नजर काढण्यासाठी हवनातील राखेचा वापर करू शकता. वास्तुशास्त्रानुसार घरातील सदस्यांना नजरदोष लागू नये यासाठी हवनातील राखेचा तिलक लावला जातो. यामुळे नजरदोषातून मुक्ती मिळते.

बातमी वाचा- Rahu Gochar: 2023 या वर्षात राहुची या राशींवर असेल कृपा, आर्थिक गणित सुटणार!

-घरात पैसा टिकून राहावा यासाठी हवन केल्यानंतर राख सांभाळून ठेवावी. राख थंड झाल्यानंतर लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवावी. यामुळे आर्थिक अडचण दूर होते. 

-काही जणांना रात्री भीतीदायक स्वप्न पडतात. हवनातील राखेचा तिलक लावल्याने अशी स्वप्न पडणं बंद होतं. हा उपाय सलग चार दिवस करावा.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.) 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *