Headlines

#HappyBirthdaySalmanKhan : भाईचा बर्थडे; सलमानसाठी शाहरुखसह एकवटल्या त्याच्या खास मैत्रिणी, पाहा आणखी कोणी लावली हजेरी

[ad_1]

#HappyBirthdaySalmanKhan : बॉलिवूडचा भाईजान आणि सुपरस्टार सलमान खानचा (Happy Birthday Salman Khan)  आज वाढदिवस. भाईचा बर्थडे त्याच्या चाहत्यांमध्ये एक वेगळाच उत्साह घेऊन येतो. (salman khan birthday)  
सलमान खानने आपला 57 वा वाढदिवस साजरा केला, तो आता साठीच्या जवळ पोहचला आहे तरीही तरीही त्याच्या चार्म आजही चाहत्यांना भुरळ घालतो हे नक्की त्याचा फिटनेस आजही तरुणांना लाजवेल असा आहे.  

सलमान खानची बहीण अर्पिताने नुकताच सलमानच्या वाढदिवसानिमित्त बांद्रा मध्ये  एक पार्टी च आयोजन केलं होत. या पार्टीला बॉलीवूड मधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. सलमान खानाने उपस्थित फॅन्स सोबत केक कापून आपला वाढदिवस साजरा केला आणि चाहत्यांना देखील खुश केलं. 

चला तर मग पाहूया भाईजानच्या वाढदिवसाला कोणी कोणी हजेरी लावली होती. 

दरवर्षी सलमान खान पनवेल मधील फार्म हाऊसवर कुटुंबियांसोबत साजरा करतो, मात्र यावर्षी पनवेल ला न जात मुंबईमध्येच भाईजान आपला वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. 

यावेळी चक्क शाहरुख खान त्यानेसुद्धा बर्थडे पार्टी ला हजेरी लावली होती. लवकरच शाहरुख खान याचा पठाण (PATHAAN MANIA IN 30 DAYS) सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय, 

अभिनेत्री तब्बू जिने नुकताच दृश्यम २ सिनेमात उत्तम अभिनय करून सर्वाना मोहित केलं तिनेसुद्धा सलमानच्या वाढदिवसाच्या पार्टीला उपस्थिती दर्शवली . 

 बॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. पूजाने सुद्धा भाईच्या बर्थडे पार्टीला हजेरी लावली. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानसोबत (Salman Khan) पूजाची जवळीकता वाढत असल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. ते दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याची बातमी ही आगीसारखी पसरली आहे. खरंतर या अफवेत किती तथ्य आहे, याबाबत काहीही बोलणं कठीण आहे. सध्या पूजा ही सलमानच्या प्रोडक्शन हाऊसच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात दिसणार आहे. सेटवर त्यांच्यात जवळीक वाढल्याचे म्हटले जात आहे. (pooja hegde salman khan relationship)

गेल्या वाढदिवसाला सलमानला चावला होता साप 

गेल्या वर्षी आपल्याला माहीतच आहे, सलमान खान ला पनवेल फार्महाऊसवर वाढदिवसाच्या दिवशी सापाने चावा गघेतला होता सुदैवाने हा साप विषारी नसल्यामुळे त्याच्या जीवाला धोका पोहचला नव्हता.वाढदिवसाची पूर्वसंध्या सलमानसाठी अतिशय वाईट ठरली. पनवेलच्या फार्महाऊसवर सेलिब्रेशनसाठी आलेल्या सलमानला साप चावला आणि त्याला कामोठ्यातल्या MGM हॉस्पिटलमध्ये भरती व्हावं लागलं. हॉस्पिटलमध्ये 6 तास उपचार केल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला.

एकूणच काय तर सलमान खान च्या बर्थडेची पूर्वसंध्या नक्कीच फार सुंदर आणि धमाल झाली असणार यात काहीच शंका नाही, झी २४ तासाच्या टीमकडून सुद्धा भाईजान सलमान खान ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *