Headlines

तुझ्याशिवाय मी…; Suryakumar Yadav ने खास अंदाजात दिल्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

[ad_1]

Suryakumar Yadav’s Message To Wife: टीम इंडियाचा स्टार खेळाडू आणि टी-20 क्रिकेटमधील नंबर 1 फलंदाज म्हणजे सूर्यकुमार यादव  (Suryakumar Yadav) . सूर्याने नुकत्याच झालेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये (T20 world cup) त्याची तुफान फलंदाजी सर्वांना दाखवून दिली आहे. तर सूर्यकुमारच्या आयुष्याची गेमचेंजर त्याची पत्नी देविशा शेट्टी (Devisha shetty) आहे. दरम्यान देविशाचा आज वाढदिवस असून सूर्याने फार खास पद्धतीने तिला वाढदिवसाच्या (Birthday) शुभेच्छा दिल्या आहेत. 

क्रिकेटर सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) ने खूप खास पद्धतीने पत्नी देविशाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सूर्याने सोशल मीडिया (Social Media) प्लेटफॉर्म इंस्टाग्राम (Instagram)वरून पत्नीला शुभेच्छा दिल्यात. 

सूर्याने देविशासोबतचा फोटो पोस्ट करत देविशाला शुभेच्छा दिल्यात. त्याने लिहिलंय की, “माझ्या सुंदर पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माझ्या आयुष्याचा केंद्रबिंदू, माझ्या सर्व समस्या सोडवणारी आणि जी मला प्रेरित करते. मला माहित नाही की मी तुझ्याशिवाय काय केलं असतं?” 

टीम इंडियाच्या (Team India) सूर्यकुमार यादवचा (Suryakumar Yadav) बोलबाला पाहायला मिळाला आहे. सूर्यकुमारने आपलं अव्वल स्थान कायम राखंलंय. पहिल्या क्रमांकाच्या शर्यतीत सूर्याच्या आसपास कुणीही नाही. सूर्यकुमारने टी 20 वर्ल्ड कपमध्ये (T 20 World Cup 2022) धमाकेदार कामगिरी करत पहिलं स्थान मिळवलं होतं. सूर्याने टी 20 वर्ल्ड कपमधील सुपर 12 मधील 5 सामन्यात 3 अर्धशतकं ठोकली होती.

सूर्याला वर्ल्ड कपमधील कामगिरीमुळे करियरमधील सर्वोत्तम 869 रेटिंग्स पॉइंट्स मिळाले होते. मात्र सूर्या इंग्लंड विरुद्धच्या सेमी फायनलमध्ये 10 धावांवर आऊट झाला होता. त्यामुळे सूर्याला 10 रेटिंग्स पॉइंट्सने नुकसान झालं. मात्र त्यानंतरही सूर्याने 859 पॉइंट्ससह सिंहासन कायम राखलंय.

टी 20 वर्ल्ड कपमधील कामगिरी

सूर्याने टी 20 वर्ल्ड कपमध्ये 189.68 च्या कडक स्ट्राईक रेटने 239 धावा कुटल्या होत्या. सूर्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर होता. 

सूर्या व्यतिरिक्त रँकिंगमध्ये टॉप 10 मध्ये एकाही भारतीय फलंदाजाचा समावेश नाही. विराट कोहली (Virat Kohli) 11 व्या स्थानी आहे. तर लोकेश राहुल (K L Rahul) आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) अनुक्रमे 17 आणि 18 व्या क्रमांकावर विराजमान आहेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *