Headlines

Happy Birthday Tina Ambani : राजेश खन्ना ते संजय दत्तपर्यंत सगळेच तिचे दिवाने होते, एकेकाळीची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आज आहे अंबानी कुटुंबाची धाकटी सून

[ad_1]

Tina Ambani Birthday : आशियातील सर्वात श्रीमत मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे धाकटे बंधू अनिल अंबानी (Anil Ambani) यांची पत्नी टीना अंबानी यांचा आज वाढदिवस. आज त्यांचा 66 वा वाढदिवस आहे. अंबानी कुटुंबाची धाकटी सून आणि बॉलीवूड अभिनेत्री टीना मुमीन (Tina Mumin)  म्हणजे टीना अनिल अंबानी हिची गणना त्या सेलिब्रिटींमध्ये केली जातं होती, त्यांना ब्युटी विथ ब्रेन म्हटलं जातं होतं. आज लाइमलाइटपासून कोसो दूर असलेल्या अंबानी घराण्याची धाकटी सून एकेकाळी बॉलिवूडच्या अशा अभिनेत्रींमध्ये गणली जायची. जिच्यावर इंडस्ट्रीतील बड्या अभिनेते प्रेम करत होते. होय, टीना अंबानी त्या काळात बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्री होती. 

11 फेब्रुवारी 1957 रोजी मुंबईतील गुजराती कुटुंबात जन्मलेल्या टीना यांना लहानपणापासूनच ग्लॅमरची दुनिया आकर्षित करत होती. त्यांना मॉडेलिंगचही वेड होतं. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. देस परदेस हा त्यांचा पहिला चित्रपट होता. 

बेपनाह मोहब्बत! 

तुम्हाला जाणून धक्का बसेल पण टीना यांच्या लव्ह लाइफमुळे (Tina Ambani Love life) कायम चर्चेत असायच्या. संजय दत्तपासू ते राजेश खन्ना यांच्यापर्यंत सगळ्यांशी त्यांचं नाव जोडलं गेलं होतं. राजेश खन्ना आणि टीना मुनीम (Tina Ambani – Rajesh Khanna ) यांच्या प्रेमाची खूप चर्चा झाली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे दोघे अनेक वर्षांपासून एकत्र होते. असं म्हणतात की डिंपल कपाडियाशी लग्न केल्यानंतरही राजेश खन्ना टीना मुनीमसोबत रिलेशनशिपमध्ये राहिले. काकांचं टीना यांच्यावर खूप प्रेम होतं. काकांनी हे नातं लपवूनही ठेवलं नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार असं म्हणतात, राजेश खन्ना यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ते टीनावर इतकं प्रेम करतात की ते एकच टूथब्रश वापरतात. त्यांच्या या मुलाखतीची खूप चर्चा झाली होती. राजेश खन्ना यांनी डिंपल यांना घटस्फोट देऊन त्यांच्याशी लग्न करावं, अशी टीना यांची इच्छा होती. पण राजेश खन्ना यांना हे शक्य नव्हतं. बऱ्याच प्रतीक्षेनंतर टीना यांनी त्याच्यासोबत ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला.

rajesh_khanna_Love_story

मग एन्ट्री झाली संजय दत्तची…

 संजय दत्त आणि टीना ( Tina Ambani – Sanjay Dutt) यांनी 1981 मध्ये रॉकी या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. मीडिया सूत्रांच्यानुसार चित्रपटादरम्यान या दोघांमधील जवळीक वाढली आणि त्याचं रुपांतर प्रेमात झालं. पण संजय दत्तची नशा आणि अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे हे नातं पुढे जाऊ शकलं नाही. (tina ambani birthday rajesh khanna sanjay dutt and anil ambani Love story know facts about ambani familys choti bahu unseen Photos and videos)

sanjay_dutt_Love_story

टीना आणि अनिल अंबानी यांची लव्हस्टोरी चित्रपटासारखी (Tina and Anil Ambani Love story)

सिमी ग्रेवालच्या शोमध्ये अनिल अंबानी यांनी त्यांच्या पहिल्या भेटीचे रहस्य उघड केलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की, ‘मी टीनाला पहिल्यांदा एका कॉमन फ्रेंडच्या लग्नात पाहिलं होतं. तिने काळी साडी घातली होती. मला ती पहिल्या नजरेतच आवडली. अनिल पुढे म्हणाले की, तेव्हा मी विचार करत होतो की,  अंत्यसंस्कारात काळ्या साड्या नेसतात मग टीना यांनी लग्नात काळी साडी का नेसली?. 

जेव्हा टीना अनिलसोबत बाहेर जाण्यास नकार देते

अनिल अंबानी यांची टीनासोबतची दुसरी भेट फिलाडेल्फियामध्ये झाली होती. अनिल काही कामानिमित्त तिथे गेले होते, तर टीना या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तिथे गेल्या होत्या. अनिल यांनी सांगितलं की, टीना मुनीम यांनी भेटीदरम्यान त्यांच्याकडे खूप दुर्लक्ष केलं होतं.

anil_ambani_Love_story

यावर टीना म्हणाला की, ‘हे योग्य नाही. मी त्यांना ओळखत नव्हते. कोणीतरी माझी ओळख करून दिली आणि सांगितलं की ते माझी खूप कौतुक करत असतात. अनिल यांना मला बाहेर घेऊन जायचे होते, पण मी त्यांना ओळखत नव्हते, म्हणून मी नकार दिला.

अंबानी कुटुंबाने टीनाला सून म्हणून स्वीकारले नाही

1986 मध्ये टीनाच्या भाच्याने अनिलला यांची भेट घडवून आणली. यानंतर दोघेही अनेकदा भेटले आणि शेवटी दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांनाही त्यांच्या नात्याला लग्नाचं नाव द्यायचं होतं, पण अंबानी कुटुंबीयांना चित्रपटात काम करणारी मुलगी सून म्हणून नको होती. 

https://www.youtube.com/watch?v=hWHWf10Bx6M

अंबानी कुटुंब लग्नासाठी तयार नव्हते. यामुळे दोघांनीही नातं संपवण्याचा प्रयत्न घेतला. पण देव जोडपे बनवतो असं म्हणतात. शिक्षण पूर्ण करण्यासाठी टीना या अमेरिकेला गेल्या. 1989 मध्ये अमेरिकेत भूकंप झाला होता. अनिल यांनी टीना यांच्याशी संपर्क साधला त्यांची तब्येतीची विचारपूस केली आणि दोघे पुन्हा जवळ आले. त्यानंतर दोघांनी कोणाचीही पर्वा न करता 1991 मध्ये लग्न केले. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *