Headlines

“स्त्रीरोग तज्ज्ञ कधीच हातपाय बघत नाही आणि…”; डॉक्टरांबद्दल बोलताना शिंदे सरकारचे मंत्री गुलाबराव पाटील यांचं वादग्रस्त विधान | eknath shinde Fadanvis Government Minister Gulabrao Patil Controversial comment on Ladies Specialist Doctors scsg 91

[ad_1]

शिंदे आणि फडणवीस सरकारमधील पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी रविवारी जळगावमधील एका कार्यक्रमामध्ये केलेल्या एका विधानावरुन नवीन वाद निर्माण झाला आहे. “मंत्र्यांपेक्षा डॉक्टर बरे. स्त्रीरोग तज्ञ कधीच हातपाय बघत नाही आणि हातपाय बघणारा कधीही स्त्रीरोग तज्ञ होऊ शकत नाही,” असं गुलाबराव पाटील यांनी एक जाहीर कार्यक्रमातील भाषणात म्हटलं आहे.

गुलाबराव पाटील यांनी जळगावात एका कार्यक्रमामध्ये डॉक्टर आणि मंत्र्यांमधील साधर्म्य सांगताना भाषणादरम्यान हे विधान केलं आहे. “एक हजार लोकांची ओपीडी होती. त्याचा निकाल आठ ते दहा असा दोन तासात लावला. डॉक्टर तरी बरे आमच्यापेक्षा (मंत्र्यांपेक्षा). जनरल फिजिशियन, आर्थोपेडिक, हृयदरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ. स्त्रीरोग तज्ञ असतात. स्त्रीरोग तज्ञ कधी हात-पाय बघत नाही आणि हातपाय बघणारे कधी स्त्रीरोग तज्ञ होऊ शकत नाही,” असं गुलाबराव पाटील भाषणात म्हणाले.

इतर तज्ज्ञ डॉक्टरांपेक्षा जनरल फिजिशियन्सकडे लोक वेगवगेळ्या प्रकारच्या समस्या घेऊन लोक येतात असं सांगताना गुलाबराव यांनी मंत्री आणि डॉक्टरांच्या कामाची तुलना केली. मंत्री हे जनरल फिजिशियन्ससारखे असतात असं गुलाबराव यांनी डॉक्टरांचा संदर्भ देत सांगण्याचा प्रयत्न भाषणात केला.

“आम्ही तर जनरल फिजिशियन आहोत. आमच्याकडे बायको नांदत नाही तो पण माणूस येतो. आमचं एकटं डोकं असतं तर डॉक्टरांचं एकाच फॅकल्टीचं डोकं असतं. मात्र आमचं डोकं (विचार) असं असतं की इतके लोक बसलेले आहेत त्यांच्या वेगवेगळ्या समस्या असतात आणि आम्ही ऐकणारे एकटे असतो. आम्ही समज घालून त्यांचं काम करतो. एवढं करुनही नवीन कोणी आलं तर एवढे फ्रेश असतो की त्याला पहिला तूच आला आहे असं वाटावं,” असंही म्हटलं.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *