Headlines

Guess Who : फोटोतल्या बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?

[ad_1]

celeb photo challenge : सोशल मीडियावर स्टार्सचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत स्टार्सचे काही फोटो लहाणपणीचे असतात, तर काही प्रौढ अवस्थेतले फोटो असतात. असाच एक फोटो आता समोर आला आहे. या फोटोतील बॉलिवूड अभिनेत्याला (Bollywood Actor) तुम्हाला ओळखायचे आहे. बॉलिवूड अभिनेत्याचा हा लहाणपणीचा फोटो आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हाला अभिनेत्याला ओळखायचे आहे. 

फोटोत काय?

फोटोत तुम्ही पाहू शकता एक चिमुकला टॉवेलमध्ये उभा आहे. हा फोटो त्याच्या बाथरूममधला आहे. त्याला फोटो काढायला नव्हता,मात्र तो जबरदस्ती काढला गेला आहे. यामुळे तो फोटोत नाराज असल्याचेही दिसून आले आहे. हा फोटो त्याच्या वडिलांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. फोटोतील हा चिमुकला मोठा होऊन बॉलिवूडचा अभिनेता बनला आहे. या अभिनेत्याला (Bollywood Actor) तुम्हाला ओळखायचे आहे. 

‘हा’ आहे अभिनेता?

हा अभिनेता (Bollywood Actor) दुसरा तिसरा कोणी नसून बॉलिवूडचा सुपरहिट अभिनेता सनी देओल आहे. सनी देओलच्या बालपणीचा हा फोटो आहे, जो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोत तो टॉवेलमध्ये दिसत आहे. सनी देओलचा (sunny deol) हा ब्लॅक अँड व्हाइट फोटो आहे. फोटोमध्ये तो बाथरूममध्ये उभा असल्याचे दिसत आहे.

काही वर्षांपूर्वी सनी देओलचा (sunny deol) हा फोटो त्याचे वडील धर्मेंद्र यांनी अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला होता. हा फोटो शेअर करून त्यांनी एक किस्सा सांगितला आहे. धर्मेंद्र यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले, ‘माझा सर्वात भोळा मुलगा, मला टॉवेलशिवाय त्याचा फोटो काढायचा होता.बिचारा सनी नको बाबा नाही म्हणत होता… मित्रांनो, त्याची निरागसता आजही मला उदास करते. मुला, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो.

दरम्यान सनी देओलच्या (sunny deol) वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच ‘गदर 2’ हा चित्रपट घेऊन येणार आहे. त्याचा हा चित्रपट 2001 मध्ये आलेल्या गदरचा सिक्वेल आहे. सध्या सनी देओल अभिनेत्री अमिषा पटेलसोबत चित्रपटाचे शूटिंग करत आहे. या चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता आहे.  



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *