Headlines

google deleted the word pirates which was used for kanhoji angre

[ad_1]

अलिबाग : गुगल सर्च इंजिन सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांचा समुद्री चाचे असा उल्लेख केल्याने शिवभक्त संतापले होते. समाजमाध्यमांवर याच्या तिखट प्रतिक्रीया उमटल्या होत्या. गुगल सर्च इंजिनवर जाऊन इतिहास प्रेमी आणि शिवभक्तांनी याबाबत आक्षेप नोंदवण्याची मोहीम सुरु केली होती. यानंतर गुगलला जाग आली असून कान्होजी राजे यांच्या समोरील समुद्री चाचे असा उल्लेख हटविण्यात आला आहे.

हेही वाचा… विश्लेषण : जिथे कमी तिथे मोदी? भाजपची लोकसभेसाठी काय आहे रणनीती?

मराठा आरमाराचे प्रमुख म्हणून सारखेल कान्होजी राजे आंग्रे यांना ओळखले जाते. ब्रिटिश डच पोर्तुगीज यांची अनेक आक्रमण त्यांनी परतावून लावली. भारतीय नौदलाकडून त्यांना मेंटोर म्हणून बघितले जाते. गेल्या दोन दिवसांपासून गुगलवर कान्होजी आंग्रे हा शब्द सर्च केल्यानंतर तिथे कान्होजी आंग्रे यांचा उल्लेख पायरेट्स अर्थात समुद्रीचाचे असा करण्यात आल्याचं दिसून आलं यानंतर याच्या समाज माध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

हेही वाचा… विश्लेषण : साजिद खानमुळे पुन्हा चर्चेत आलेली MeToo मोहीम नक्की आहे तरी काय? जाणून घ्या

ही बाब लक्षात घेऊन शिवभक्तांनी आणि इतिहास प्रेमीं संघटनांनी यावर आक्षेप घेण्यासाठी मोहीम राबवली होती. दोन दिवसात हजारो आक्षेप गुगलकडे नोंदविण्यात आले होते. यानंतर गुगलने या संदर्भातील दुरुस्ती केली आहे. कान्होजी राजे आंग्रे यांच्या समोरील पायरेट्स असा उल्लेख हटविण्यात आला आहे. त्यामुळे शिवभक्तांनी समाधान व्यक्त केले आहे.

हेही वाचा… कान्होजी आंग्रेचा समुद्री चाचे असा उल्लेख केल्याने शिवभक्त संतापले

परदेशी इतिहासकारांकडून भारतातील योध्द्यांचे चुकीचे चित्र जगासमोर रंगविले जाते. त्यामुळे आपण सजग असणे आवश्यक आहे. दोन दिवसात इतिहासप्रेमी संघटनांनी यासंदर्भात गुगलकडे हजारो आक्षेप नोंदविले होते. समाजमाध्यमांवर यासंदर्भात जोरदार मोहीम राबविण्यात आली. त्यामुळे गुगलला त्याची दखल घेणे भाग पडले आहे. – रघुजीराजे आंग्रे, कान्होजी राजे आंग्रे यांचे वंशज..



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *