Headlines

Good News : सलमानच्या प्रेमात असणारी राजकुमारी गरोदर; बोल्ड फोटो शेअर करत दिली गोड बातमी

[ad_1]

मुंबई : अभिनेता सलमान खान याच्यासोबत स्क्रीन शेअर करणारी आणि त्याच्यासोबतच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीमुळं चर्चेत आलेली अभिनेत्री तिच्या कुटुंबात एका पाहुण्याच्या स्वगातासाठी सज्ज झाली आहे. (Salman Khan)

‘प्रेम रतन धन पायो’ या सलमानच्या चित्रपटातून राजकुमारीच्या भूमिकेत झळकलेली आणि सलमाननं साकारलेल्या प्रेमवर नितांत प्रेम करणारी अशी अभिनेत्री म्हणजे सोनम कपूर. (Sonam Kapoor pregnant)

एव्हरग्रीन अभिनेते अनिल कपूर यांची लाडाची लेक सोनम आणि तिचा पती, आनंद अहूजा आता त्यांच्या या नात्यात एका नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. 

खुद्द सोनमनंच अतिशय सुरेख आणि तितकेच बोल्ड फोटो शेअर करत यासंदर्भातली माहिती दिली. तिनं शेअर केलेल्या फोटोंमध्ये  पती आनंद अहूजाही दिसत आहे. 

फोटोमधील सोनचा लूक पाहता या अभिनेत्रीनं गरोदरपणातही तिचं फॅशनवरचं प्रेम कमी केलेलं नाही हे स्पष्ट होत आहे. ‘चार हात… तुझं शक्य तितकं चांगलं संगोपन करण्यासाठी…’ असं म्हणत सोनमनं आम्ही तुझ्या स्वागतासाठी आता वाट पाहू शकत नाही इतके उत्सुक आहोत अशा आशयाचं कॅप्शन लिहिलं. 

#everydayphenomenal #comingthisfall2022 असे हॅशटॅगही तिनं या पोस्टसोबत जोडले. 

बस्स, सोनमकडे गुड न्यूज असल्याचं कळताच तिच्यावर आणि आंद अहूजावर शुभेच्छा आणि सदिच्छांचा वर्षाव करण्यास अनेकांनीच सुरुवात केली.

करिना कपूर, दिया मिर्झा यांनीही सोनमला तिच्या मातृत्त्वासाठी शुभेच्छा दिल्या. फक्त कलाकार मंडळीच नव्हे, तर अनेक फॉलोअर्सनीही तिच्या या गोड बातमीसाठी शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळालं. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *