Headlines

आमिर खानच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; अभिनेत्याच्या घरी वाजणार सनई चौघडे

[ad_1]

मुंबई : मिस्टर परफेक्सनिस्ट आमिर खानची मुलगी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. आयारा गेली अनेक वर्ष नुपुर शिखरेला डेट करत आहे. दोघांनी 2022मध्ये साखरपुडा केला. ज्यानंतर दोघंही लग्नबंधनात अडकणार आहेत. आता नुकतीच त्यांच्या  लग्नाची तारिखही समोर आली आहे.
 
लग्नाच्या चर्चांदरम्यान आयरा खान आणि नुपूर शिखरेच्या लग्नाची पत्रिका समोर आली आहे. समोर आलेल्या लग्नपत्रिकेवर या दोघांच्या लग्नाची तारीख 13 जनवरी 2024 ठरली असल्याचं दिसत आहे. दोघंही मुंबईमध्ये धुमधड्याक्यात लग्न करणार आहेत. ज्याची तयारी जोरदार सुरुही झाली आहे.

रिपोर्टनिसार आमिर खान आणि त्याची एक्स पत्नी  रीना हे दोघंही या लग्नाची तयारी एकत्र मिळून करत आहेत. हा एक शाही विवाह सोहळा असेल ज्याची तयारी सुरु झाली आहे. नुपूर आणि आयराच्या लग्नात बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. मात्र, हा शाही विवाह सोहळा कोठे पार पडणार आहे याची अद्याप माहिती समोर आलेली नाही.

लग्नात अहेर न आणण्यास नकार
लग्नपत्रिकेत लिहीलं आहे की, माझी मुलगी आयरा आणि नुपूर यांच्या लग्नासाठी तुम्हाला आमंत्रित करताना मला खूप आनंद होत आहे. आमच्या या आनंदाच्या क्षणात सामील व्हा. 13 जानेवारी, शनिवार. लव्ह प्रितम, रीना आणि आमिर. या कार्डच्या शेवटी लग्नाला येणार्‍या पाहुण्यांनी फक्त आशीर्वाद द्यावेत, असंही स्पष्ट लिहिलं आहे.

लग्नाची तारिख पुढे ढकलली 
आमिर खानने एका मुलाखतीत सांगितलं की, आयराच्या एंगेजमेंटनंतर लग्नाच्या तारखेबद्दल सांगितलं आहे याविषयी बोलताना अभिनेता म्हणाला की,  माझी लेक आणि नुपूर दोघं 3 जानेवारी 2024 रोजी लग्न करणार आहेत, मात्र समोर आलेल्या अहवालात, तारीख बदलून 13 जानेवारी करण्यात आली आहे.

आयरा खान आणि नुपूर शिखरे गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. दोघांनी गेल्या वर्षी २०२२ मध्ये साखरपुडा केला यावेळी आयराने लाल रंगाचा रेड गाऊन परिधान केला आहे. नुपूरने ब्लॅक टस्कीडो परिधान केला होता. 

एंगेजमेंटआधी नुपूरने आयराला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. यावेळी त्याने तिला अंगठी घातली होती. यानंतर आयराने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या एंगेजमेंटची घोषणा केली. नूपूर आणि आयराने अनेकदा सोशल मीडियावर एकत्र फोटो शेअर केले होते. आयरा खान ही आमिर खान आणि त्याची पहिली पत्नी रीना यांची मोठी मुलगी आहे. आयराने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरे सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *