Headlines

ग्लॅमरस अ‍ॅथलीट्स सोबत वाईट कृत्य, ऐकूण धक्का बसेल

[ad_1]

मुंबई : ग्लॅमरस राहायला कोणाला आवडणार नाही. प्रत्येक स्त्रीला ग्लॅमरस रहावेसे वाटते. मग ती अभिनेत्री असो, अॅथलीट असो, अथवा एखादी सामान्य स्त्री. मात्र एका अ‍ॅथलीटला ग्लॅमरस राहणं खुपच महागात पडलं आहे. ग्लॅमरस दिसण्यामुळे तिच्यासोबत वाईट कृत्य घडल्याची घटना घडली आहे.  

युथ आयकॉन, मॉडेल आणि फिटनेस सॅव्ही अ‍ॅथलीट शर्ल्स लार्सनसोबत (Shirls Larson) संतापजनक कृत्य घडलंय. शर्ल्स लार्सनला तिला तिच्या जीममधून बाहेर करण्यात आले आहे. जीम व्यवस्थापनाने तिच्यासोबत केलेल्या या कृत्याने तिला मोठा धक्का बसला आहे. 

सोशल मीडियावर पोस्ट केली शेअर  
या घटनेनंतर अ‍ॅथलीट शर्ल्स लार्सनने (Shirls Larson) सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. शर्ल्स लार्सन तिच्या पोस्टमध्ये म्हणते की, मी उत्साही आणि सर्वांशी खूप मैत्रीपूर्ण राहते. मी स्वतःला महत्त्वाची समजते. तसेच नवीन ठिकाणी (जिम) मी स्वतःला लगेच अॅडजस्ट करेन. मी काहीही घातले तरी चालेल, ते माझ्या इच्छेनेच ठरवले जाईल, असे तिने म्हटले आहे. 

‘हे’ आहे कारण
शर्ल्स लार्सनने (Shirls Larson) तिच्या पोस्टमध्ये अलीकडे काही जुने फोटो शेअर केले होते. या फोटोच्या कॅप्शनला तिने लिहले की, ती गेली 6 वर्षे ज्या जिममध्ये जात होती, त्या जीम मालकांनी तिला क्षणार्धात हाकलून दिले. तसेच ती अधिक ग्लॅमरस दिसत होती आणि नकार देऊनही तिचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत होती, त्यामुळे तिला जीममधून हाकलून दिल्याचे तिने सांगितले आहे. माझे जिम सदस्यत्व संपवण्याचे कारण म्हणजे मी ‘टेस्टलेस’ आणि अनैतिक सामग्री पोस्ट करते, असेही तिने सांगितले. 

शर्ल्स लार्सनची (Shirls Larson) पोस्ट आता व्हायरल होत आहे. शर्ल्सचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. अशा परिस्थितीत जेव्हा तिने ही पोस्ट शेअर केली तेव्हा तिचे चाहते चांगलेच संतापले. अनेक चाहत्यांनी तिला पाठिंबा दिला. त्याचवेळी, काही चाहत्यांनी जिमवर बहिष्कार टाकल्याची चर्चा आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *