Headlines

घरासमोरच धक्कादायक अवस्थेत आढळला अभिनेत्याचा मृतदेह; बातमी विचलित करणारी

[ad_1]

मुंबई : चित्रपटसृष्टीतून नुकतीच हादरा देणारी एक बातमी समोर आली आहे. जिथं एका अभिनेत्याला वाईट अवस्थेत मृत्यू झाल्याचं कळत आहे. ही बातमी समोर येताच अनेकजण विचलित होत आहेत. (malayalam actor nd prasad found dead in front of his house)

माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार मल्याळम अभिनेता  एनडी प्रसाद (ND Prasad) यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. राहत्या घरासमोरच त्यांचा मृतदेह एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. सदर घटनेमुळं कला जगताला हादरा बसला आहे. 

कोच्ची येथील कलामास्सेरीमध्ये ते आपल्या कुटुंबासमवेत राहत होते. प्राथमिक माहितीनुसार पोलिसांनी सदर प्रकरणी 43 वर्षीय अभिनेत्याच्या आत्महत्येचं कारण पुढे केलं आहे. 

पोलिसांच्या माहितीनुसार अभिनेता कौटुंबीक प्रश्नांमुळे तणावाचा सामना करत होता. त्याच्या मुलांनीच घराबाहेरच्या झाडावर मृतदेह लटकलेला पाहिला आणि त्यांनी शेजाऱ्यांना याची माहिती दिली. हा अभिनेता चित्रपटांमध्ये लहानमोठ्या भूमिका साकारत होता. 

पत्नीसोबतचा वाद आणि त्यामुळं असणाऱ्या नैराश्यामुळं अभिनेत्यानं टोकाचं पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे. काही दिवसांसाठी तो आणि पत्नी, विभक्त राहत असल्याचीही माहिती समोर आली आहे. 

Shocking! Malayalam actor ND Prasad found hanging outside his home

एनडी प्रसाद या नावाची चर्चा यापूर्वी काही गंभीर प्रकरणांच्या वेळी झाली होती. त्यांच्यावर ड्रग्ज बाळगण्याचेही आरोप होते. या अभिनेत्यानं आयुष्य संपवलं की त्याच्यासोबत आणखी काही घडलं यावर मात्र प्रश्नचिन्हं कायम आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *