Headlines

लग्न करणं अभिनेत्रींसाठी शाप? प्रसिद्ध अभिनेत्रीच्या जीवनातील संघर्ष, Casting Couch बाबत म्हणाली…

[ad_1]

मुंबई : हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री दीप्ती नवल (Deepti Naval) यांनी आपल्या अभिनयाने अनेक हिट चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले आहेत. एकेकाळी रुपेरी पडद्यावर सक्रीय असणाऱ्या दीप्ती या आता चित्रपटांमध्ये क्वचितच पाहायला मिळते. असं म्हटलं जातं की अभिनेत्रीनं लग्न केलं की तिला चित्रपट मिळणं बंद होतात किंवा त्यांना अशा भूमिका मिळतात की ज्यात अभिनेत्रीला मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीची मोठी बहिण किंवा सहाय्यक भूमिका मिळते. दीप्ती नवल या बॉलिवूडमधील प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहेत. दीप्ती यांनी त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मने जिंकली. दीप्ती यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

दीप्ती यांनी एका मुलाखतीत सांगितले की त्या डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या. एक काळ असा होता की त्याला चित्रपट मिळणे बंद झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दीप्ती यांनी सांगितले की, 80 च्या दशकात लग्नानंतर त्यांना हळूहळू चित्रपट मिळणे बंद झाले. ही गोष्ट त्यांना खूप त्रास देत असते. दीप्ती यांनी 1978 मध्ये श्याम बेनेगल यांच्या ‘जुनून’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. दीप्ती यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले, ज्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांचा प्रोफेश्नल दर्जा वाढत गेला. ‘जुनून’ नंतर त्यांनी ‘चश्मे बद्दूर’, ‘साथ-साथ’, ‘किसी से ना कहना’, ‘रंग बिरंगी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. या चित्रपटांच्या माध्यमातून त्याच्या उत्कृष्ट अभिनयाची झलक पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाली. (Deepti Naval Depression)

दीप्ती यांचे लग्न 1985 मध्ये प्रकाश झा यांच्याशी झाले होते. त्यांनी सांगितले की जेव्हा त्यांचे लग्न झाले तेव्हा त्यानंतर त्यांना भूमिका मिळणे बंद झाले. त्यांची प्रतिभा पूर्णपणे वाया गेल्याचे त्यांना त्याला वाटले. त्या म्हणाल्या, ‘मी त्या टप्प्यातून गेले आहे. माझ्या आयुष्यात अशी काही वर्षे होती जेव्हा माझ्याकडे काम नव्हतं. मी स्वतःला एक कलाकार म्हणून पाहिल्यामुळे माझ्यासोबत काय होत आहे हे मला समजत नव्हतं. जर तुम्हाला काम करण्याची संधी मिळत नसेल तर तुम्ही कोण आहात? मला फक्त माझ्या कामावर परतायचे होते. याच गोष्टीचा मला खूप त्रास होता. यामुळे मी डिप्रेशनची शिकार झाले.

हेही वाचा : Ajay Devgn रचतोय विक्रमावर विक्रम; आता तर अभिनेत्याने मोडले सर्व रेकॉर्ड

त्या पुढे म्हणाला की ‘आज बॉलिवूड इंडस्ट्री पूर्वीसारखी राहिलेली नाही. बरेच बदल झाले आहेत आणि इंडस्ट्री स्वतःला पुन्हा शोधत आहे. आता बॉलिवूडमध्ये कास्टिंग डायरेक्टरच्या सहभागामुळे चित्रपट निर्मात्यांपर्यंत पोहोचणे कमी झाले आहे. कास्टिंग काऊच आणि आतल्या आणि बाहेरच्या लोकांची संकल्पना नेहमीच राहिली आहे. पण तुम्हाला तुमचा मार्ग स्वतःच बनवावा लागेल. तुम्हाला सुरुवातीपासूनच माहित आहे की हे इंडस्ट्रीत आधीच घडले आहे. (actress deepti naval says she got depressed as she stopped getting roles after marriage) 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *