Headlines

जॉर्जिया एंड्रियानीचा बोल्ड लुक, फोटो पाहून चाहते थक्क

[ad_1]

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरासोबत (Malaika Arora) घटस्फोट झाल्यानंतर अभिनेता अरबाज खानचे (Arbaaz khan) नाव विदेशी गर्ल जॉर्जिया एंड्रियानीशी (Giorgia Andriani) जोडले गेले. जॉर्जिया एंड्रियानी तिच्या रिलेशनशिपसह ग्लॅमरसमुळेही नेहमीच चर्चेत असते. आता तिचे फोटो आणि व्हि़डिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकताच तिचा नवीन फोटो समोर आला आहे. या फोटोने सोशल मीडियावर धुमाकुळ घातलाय. 

जॉर्जिया एंड्रियानी (Giorgia Andriani)  सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असते. सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. तिचे दररोज नवनवीन लुक व्हायरल होत असतात. कधी तिचा जिम लुक, तर कधी वेकेशन मधले फोटो चर्चेत येत असतात. आता असाच तिचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोची सोशल मीडियावर खुप चर्चा आहे.  

जॉर्जिया (Giorgia Andriani) घरातून बाहेर पडल्या पडल्या तिची एक झलक कॅमेरात कैद करण्यासाठी पापाराझीचे कॅमेरे आतुर असतात. मात्र जॉर्जिया काही कमी नाही, बहुतेकदा ती इन्टाग्रामवर फोटो पोस्ट करून चाहत्यांना वेड लावत असते. आता असाच तिने फोटो पोस्ट करून चाहत्यांना वेड लावले आहे. 

फोटोत काय? 
जॉर्जियाच्या (Giorgia Andriani) लेटेस्ट लूकबद्दल बोलायचे झाले तर, फोटोत तिने लाल रंगाचा सूट परिधान केला आहे. या फोटोत ती अतिशय सुंदर दिसत आहे. लाल रंगात तिच सौंदर्य आणखीणच खुलून दिसत आहे. तिच्या या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा आहे. 

लुकची एकच चर्चा 
जॉर्जियाने  (Giorgia Andriani)  लाल रंगाच्या स्ट्रॅपी सूट परिधान केला आहे. यासोबत तिच्या गळ्यात दुपट्टा आहे, जो तिला हॉट टच देत आहे. यासोबतच ऑक्सिडाईज मेटलच्या बांगड्या आणि कानातले तिच्या लुकमध्ये भर घालत आहेत.

दरम्यान जॉर्जिया  (Giorgia Andriani) या फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. जॉर्जियाच्या य़ा फोटोवर कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पडतोय.या फोटोंची सोशल मीडियावर खुप चर्चा आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *