Headlines

”ब्री ग्रेड चित्रपटांत काम केलंय म्हणून…”; ‘गदर-2’च्या अभिनेत्रीवर आक्षेप; अमीषा पटेल आली मदतीला धावून

[ad_1]

Gadar 2 Ameesha Patel Simrat Kaur : 22 वर्षांपुर्वी तुम्ही ‘गदर’ हा चित्रपट पाहिला असेलच. आता त्याचा दुसरा भाग म्हणजेच ‘गदर 2’ हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 11 ऑगस्ट रोजी हा चित्रपट संपुर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे. सनी देओल आणि अमीषा पटेल यांची जोडी यावेळी पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या चित्रपटाचे फॅन्स त्यांचा चित्रपट कधी प्रदर्शित होतो आहे याची वाट पाहत आहेत. परंतु सध्या या चित्रपटावरून खटके उडायला सुरूवात झाली आहे. 

वाद 1 : अमिषा पटेल आणि दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्यात या सिनेमाबाबत वादंग उठला होता. अनिल शर्मा यांच्यावर तिनं सेटवर गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. 

वाद 2 : या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आता लवकरच या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित होईल. या सिनेमातील लोकप्रिय गाणी पुन्हा पुर्नरूज्जीवित करण्याचा प्रयत्न निर्मात्यांनी केला आहे. त्यातून या टीझरमध्ये अमिषा मरते आहे की काय अशी चर्चा टीझरवरून सोशल मीडियावर रंगली होती. त्यानंतर अगदी काही दिवसांपुर्वी अमिषानं याबद्दल खरं सांगितलं होतं. त्यामुळे नेटकऱ्यांनी तिला कथा आधीच सांगितल्याबद्दल ‘स्पॉईलर’ असं म्हणत ट्रोल केलं.

वाद 3 : आता या दोन वादांनंतर अमिषा पटेलचं अजून एक ट्विट हे व्हायरल होतं आहे. यावेळी तिनं या चित्रपटातून सनी देओलच्या सूनची भुमिका करणाऱ्या सिमरत कौरच्या बचावासाठी हे ट्विट केलं आहे. 

नक्की प्रकरण काय? 

सध्या ‘गदर 2’ या चित्रपटातून सिमरत कौर ही अभिनेत्री नव्या रूपात प्रेक्षकांच्यासमोर येते आहे परंतु तिला यावेळी सोशल मीडियावर ट्रोल होते आहे. याला कारण म्हणजे तिचे स्क्रीनवर रूप. यावेळी तिला ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांवर तिनं आक्षेप घेतला आहे आणि सिमरतला पाठिंबा दिला आहे. यावरून सिमरत कौरनं बी ग्रेड फिल्म्समध्ये कामं केली आहेत आणि अत्यंत बोल्ड सीन्स दिले आहेत. यामुळे सोशल मीडियावर तिला टोमणे ऐकावे लागत आहेत. 

अमिषा पटेलनं यावेळी सिमरत कौरचे जूने फोटो शेअर केले आहेत ज्यातून तिच्या चांगल्या प्रतिमेचे प्रदर्शन करत अमिषानं तिचा बचाव केला आहे. यावेळी ट्विट करून तिनं लिहिलं आहे की, माझ्या प्रिय चाहत्यांनो, कृपया हे सर्व थांबवावे. हा चित्रपट तुम्ही 11 ऑगस्टला पाहावा. आपल्या सर्वांनी प्रेम द्यावे ही विनंती.

ट्रोलर्स काय म्हणाले? 

ट्रोलर्स म्हणाले की, ”ब्री ग्रेड सिनेमांमध्ये काम केलेल्या अभिनेत्रीला गदर 2 सारख्या पवित्र आणि स्वच्छ चित्रपटात का घेतले आहे?”

अमीषा काय म्हणते? 

अमीषा म्हणाली की, ”मी एक मुलगी म्हणून सांगते आहे की कृपया हे थांबवा आणि सकारात्मकता पसरवा. कोणत्याही मुलीला अशाप्रकारे लाजवू नका. तिच्या कलागुणांना प्रोत्साहन द्या.”

हेही वाचा 

1. शॉपिंग करताना आली मॉडेलिंगची ऑफर; फोटोत दिसणारी छोटी मुलगी आहे लोकप्रिय अभिनेत्री

2. ‘सुंदरा’ फेम अक्षया नाईकचं ट्रोलर्सला खणखणीत उत्तर, तुम्ही ही कराल कौतुक, बॉडी शेमिंगवर म्हणाली…

3. शाहरुख खानच्या जवान चित्रपटाच्या ट्रेलरवर सलमान खान म्हणतो, ‘मी थिएटरमध्ये…’



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *