Headlines

Free Internet | जबरदस्त ! इंटरनेट संपल्यानंतरही ही कंपनी फुकटात देतेय इतका डेटा, पाहा कसं?

[ad_1]

मुंबई : रिलायन्स जिओने (Jio) टेलिकॉम सेक्टरमध्ये (Telecom Sector) नवी क्रांती घडवली. जिओने धमाकेदार प्लन्समुळे अनेक ग्राहकांना आपल्यासोबत जोडून ठेवलं आहे. जिओ आपल्या ग्राहकांना नेहमीच विशेष सेवा देण्याचा प्रयत्न करत असते. फोर जी (4G) सेवा आल्यापासून मोठ्या प्रमाणात इंटरनेटचा वापर केला जातो. टेलिकॉम कंपनीकडून मिळणारा इंटरनेट कधीकधी संपतो. त्यामुळे अनेकदा गैरसोय होते. मात्र डेटा संपल्यानंतरही आता तुमची गैरसोय होणार नाही. जिओ डेली लिमिट संपल्यानंतरही मोफतमध्ये इंटरनेट सेवा पुरवतं. याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊयात. (jio emergency data voucher 2 gb internet data on loan pay later my jio app) 

जिओ एमरजन्सी डेटा व्हाउचर (Jio Emergency Data Voucher)

जिओ आपल्या यूझर्ससाठी एक सेवा प्रदान करतं. ‘जिओ एमरजन्सी डेटा व्हाउचर’ (Jio Emergency Data Voucher)  असं या व्हाउचरचं नाव आहे. हा डेटा प्लॅन त्या यूझर्ससाठी बेस्ट आहे, ज्यांना दररोज मिळणारा इंटरनेट संपून जातं आणि रिचार्ज करण्यासाठी पैसे नसतात. या व्हाऊचरनुसार, जिओ तुम्हाला कर्ज  म्हणून डेटा देतं.

व्हाऊचर असा वापरायचा

जिओची ही सेवा अडी-अडचणीला फार फायदेशीर ठरते. या व्हायऊचरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आधी माय जिओ अ‍ॅप (My Jio App)  डाऊनलोड करावा लागेल. या अ‍ॅपमधील मेनूत मोबाईल सर्व्हिसेज ऑप्शनवर टॅप करा. तिथे Emergency Data Voucher दिसेल. तो सिलेक्ट करा. त्यानंतर Get Emergency Data वर क्लिक करा. यानंतर पुढे एक्टिव्हेट नॉव (Activate Now)  टॅप करा. अशा प्रकारे तुम्हाला 2 जीबी डेटा कर्ज म्हणून मिळेल.

पैसे परत कसे करायचे? 

कर्ज म्हणून घेतलेल्या या 2 जीबी डेटासाठी तुम्हाला 25 रुपये द्यावे लागतील.  हे पैसे ही तुम्हाला माय जिओ अ‍ॅपच्या मदतीनेच परत करायचे आहेत.  

यासाठी माय जिओ अ‍ॅप उघडा.  Emergency Data Voucher वर क्लिक करा. त्यानंतर प्रोसिड करुन पे ऑप्शन निवडा. इथे तुम्ही कर्जाची रक्कम भरु शकता. जिओचा हा पर्याय अडचणीच्या वेळेस फार उपयोगी असआ आहे. विशेष म्हणजे या सेवेचा लाभ हे प्रीपेड यूझर्ससाठीच आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *