Headlines

Filmfare पुरस्कारावर ‘गंगूबाई’ची जादू, आलिया भट्ट, अनिल कपूर, तब्बूसह पाहा कोणी कोणी जिंकली ब्लॅक लेडी!

[ad_1]

68th Hyundai Filmfare Awards Winners List 2023: प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती ती म्हणजे फिल्मफेअर पुरस्कार 2023 (Filmfare Awards 2023) या सोहळ्याची. यंदाचा फिल्मफेअर पुरस्कार हा सगळ्यात खास होता. यावेळी अनेक मोठमोठ्या कलाकारांना आणि चित्रपटांना फिल्मफेअर नॉमिनेशन होतं. रेड कार्पेटवरील सेलिब्रेटींच्या हटके अदाकारीपासून ते डान्स, विनोद, आठवणी, धम्माल, मस्ती आणि विजेत्याचे कौतुक अशा सर्व अंगांनी हा पुरस्कार सोहळा रंगला होता. कालची रात्र ही सर्वच कलाकार आणि विजेत्यांसाठी खूपच खास होती. यावेळी फिल्मफेअर पुरस्कारांसाठी अख्खं बॉलिवूड अवतरले होते. मुंबईच्या जिओ कन्वेशन सेंटर येथे हा पुरस्कार सोहळा रंगला होता. 

संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gungubai Kathiawadi) आणि हर्षवर्धन कपूर यांच्या ‘बधाई दो’ या दोन चित्रपटांनी फिल्मफेअर पुरस्कारवर आपली मोहोर उमटवली आहे. आलिया भट्ट ही यावर्षीची सर्वात्कृष्ट अभिनेत्री ठरली तर राजकूमार राव हा सर्वात्कृष्ट अभिनेता. त्यासोबतच ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर, तब्बू आणि भुमी पेडणेकर यांनीही फिल्मफेअर पुरस्कार पटकावले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सलमान खान, मनीष पॉल आणि आयुष्यमान खुराना यांनी केले. आलिया भट्ट या सोहळ्याची खास आकर्षण ठरली. या सोहळ्याची संपुर्ण विजेत्यांची यादी ही प्रसिद्ध झाली आहे. तेव्हा जाणून घ्या तुमच्या आवडत्या कलाकारला कुठल्या क्षेणीत पुरस्कार प्राप्त झाले आहेत. 

सर्वोत्कृष्ट चित्रपट : गंगुबाई काठियावाडी

सर्वोत्कृष्ट चित्रपट (क्रीटिक्स): बधाई दो

सर्वोत्कृष्ट अभिनेता: राजकुमार राव (बधाई दो)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: आलिया भट्ट (गंगूबाई काठियावाडी)

सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रीटिक्स) : संजय मिश्रा (वध)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रीटिक्स): भूमी पेडणेकर (बधाई दो) आणि तब्बू (भूल भुलैया 2)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : संजय लीला भन्साळी (गंगूबाई काठियावाडी)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: अनिल कपूर  (जुग जुग जीयो)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: शीबा चड्ढा (बधाई दो)

सर्वोत्कृष्ट संगीत: प्रीतम (ब्रह्मास्त्र – भाग एक – शिव)

सर्वोत्कृष्ट संवाद: प्रकाश कपाडिया आणि उत्कर्षिनी वशिष्ठ (गंगूबाई काठियावाडी)

सर्वोत्कृष्ट पटकथा: अक्षत घिलडियाल, सुमन अधिकारी आणि हर्षवर्धन कुलकर्णी (बधाई दो)

सर्वोत्कृष्ट कथा : अक्षत घिलडियाल आणि सुमन अधिकारी (बधाई दो)

सर्वोत्कृष्ट पदार्पण (पुरुष): अंकुश गेडाम (झुंड)

सर्वोत्कृष्ट पदार्पण (महिला): अँड्रिया केविचुसा, (अनेक)

जीवनगौरव पुरस्कार: प्रेम चोप्रा

सर्वोत्कृष्ट एडिटिंग: निनाद खानोलकर, (अॅक्शन हिरो)

सर्वोत्कृष्ट वेशभूषा : शीतल शर्मा (गंगूबाई काठियावाडी)

सर्वोत्कृष्ट निर्मिती डिझाइन: सुब्रत चक्रवर्ती आणि अमित रे (गंगूबाई काठियावाडी)

सर्वोत्कृष्ट गीत: अमिताभ भट्टाचार्य (केसरिया, ब्रह्मास्त्र: भाग एक – शिव)

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (पुरुष): अरिजित सिंग (केसरिया, ब्रह्मास्त्र: भाग एक – शिव)

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका (महिला): कविता सेठ, (रंगिसारी, जुग जुग जीयो)

आगामी संगीत प्रतिभेसाठी आरडी बर्मन पुरस्कार: जान्हवी श्रीमानकर (ढोलिडा, गंगूबाई काठियावाडी)

सर्वोत्कृष्ट VFX: DNEG आणि रीडिफाईन (ब्रह्मास्त्र : भाग एक – शिव)

सर्वोत्कृष्ट ध्वनी डिझाइन: विश्वदीप दीपक चॅटर्जी (ब्रह्मास्त्र : भाग एक – शिव)

सर्वोत्कृष्ट बॅकग्राउंड स्कोअर: संचित बल्हारा आणि अंकित बल्हारा (गंगूबाई काठियावाडी)

सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन: कृती महेश, (ढोलिडा, गंगूबाई काठियावाडी)

सर्वोत्कृष्ट छायांकन: सुदीप चॅटर्जी (गंगूबाई काठियावाडी)

सर्वोत्कृष्ट एक्शन: परवेझ शेख (विक्रम वेध) 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *